हर घर तिरंगा बाबत जन जागृती ; म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाने केला स्तुत्य कार्यक्रम.


हर घर तिरंगा बाबत जन जागृती आणि कार्यालयीन ध्वजारोहण करताना काय करावे काय करू नये याबाबतची कार्य शाळा घेऊन म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाने केला स्तुत्य कार्यक्रम.
(म्हसळा  प्रतिनिधी)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवां अंतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत असताना त्याबाबत जनजागृती आणि कार्यालयांत ध्वजारोहण करताना काय करावे आणि काय करू नये याबाबतची कार्य शाळा. म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाने आज वाचनालयाचे हॉल मध्ये घेतली ध्वज बांधणी आणि फडकाविणे बाबत कार्यशाळा, कार्यक्रम स्तुत्य असून यामुळे सर्व तालुकात "हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात  यशस्वी होणार आसल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत प्रशिक्षक एच.बी.मोरे सर यानी आपल्या मनोगतांत मांडले.
या अभियाना अंतर्गत नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी आजपासून म्हणजे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. ध्वजाची उपलब्धता प्रत्येक पोस्ट ऑफीस मध्ये आहे असे वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यानी सांगितले. हा कार्यक्रम पंचायत समिती शिक्षण विभाग आणि सार्वजनीक वाचनालय म्हसळे यांच्या संयुक्त विद्यमाने झाला तरी तालुक्यांतील शिक्षण, आरोग्य,ग्रामपंचायत,पोलीस स्टेशन, भूमिअभिलेख,म.रा.वि. वितरण. कंपनी, तालुक्यातील बहुतांश प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेजचे प्रतिनिधी यानी ध्वजारोहणाचे कार्यशाळा आणि प्रश्नोत्तराचे वेळेचे पुरेपुर फायद्या घेतल्याचे सुरैय्या कौचाली हायस्कुलचे प्राचार्य जाकिर हुसेन हळसंगी यानी सांगितले. प्रशिक्षक मोरे सर यानी ध्वज स्तंभ, झेंडा कोणता आणि कसा आसवा घडी- गाठ मारण्याची क्रिया आणि ध्वजारोहण या बाबतच्या सर्व कृप्त्या सांगितल्या .कार्यक्रला ग्रंथालयाचे सचिव आशोक काते, संचालक आर.एस.माशाळे शिक्षण विभागाचे सलाम कौचाली,दीपक पाटील किरण पाटील ,महादेव पवार ,यादव मॅडम, निरणे मॅडम, सायली चोगले, प्राची म्हात्रे, मुकादम सर ,नीलेश पाटील ,पठाणसर आदी मान्यवर उपस्थित होते.येत्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आसून आजपासून या अभियानास सुरुवात होत आहे. या अभियाना अंतर्गत नागरिकांनी कार्यालया सह घरोघरी आजपासून म्हणजे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा