केंद्राकडून (Central Government) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून राज्याचा शिक्षणाचा दर्जा खालावला
म्हसळा तालुका प्रा. शिक्षण विभाग पूर्ण ढेपाळला : शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी रंगले खेळांत. तालुक्यांतील ३ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र अंधारात
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यांत शिक्षण विभागांत कार्यालयीन प्रशासकीय कामकाजात सूसूत्रता असावी म्हणून गटशिक्षणाधिकाऱ्यांसह ७ पदे मंजूर असून त्यापैकी ६ पदे रिक्त आहेत. केवळ १ कनिष्ठ सहाय्यक तालुका शिक्षण विभागाची प्रशासकीय धुरा सांभाळत आहे.
तालुक्याचे शिक्षण विभागाचे मुख्य कामगिरी बजावणारे गटशिक्षण आधिकारी हे पद गेले ७ वर्ष रिक्त असून मूळ कार्यरत पनवेल ( जिल्हाशिक्षण आणि प्रशिक्षण संस्था ) येथे असलेला आधिकारी याना पनवेल येथिल कार्यभार संभाळून, म्हसळा आणि कर्जत अशा दोन तालुक्यांत गट शिक्षण आधिकारी प्रभारी पदाचा अतिरीक्त कार्यभार दिला आहे. म्हसळा तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या ९४ प्रा. शाळांमधून सुमारे ३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून केंद्र प्रमुख ११ पदे रिक्त ,मुख्याध्यापक ६पदे रिक्त,४९ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत १५१ उप शिक्षकांची पदे रिक्त आहेत, तालुक्यांत उर्दू माध्यमासाठी पदवीधर शिक्षक ९ पदे रिक्त, उप-शिक्षकांची १२ पदे रिक्त आहेत. तालुक्यांत१) बनोटी २) साळविंडे ताडाचा कोंड ३) कुडगाव कोड ४)देहेन नर्सरी ५) धूम ६)कोकबाल ७) रुदवट ८) फळसप ९ )गोंडघर १०)काळसूरी ११)तोराडी मराठी १२)तोराडी (उर्दू) १४) पांगळोली (उर्दू) १५) बेटकर वाडी या
१५ प्राथमिक शाळांची बऱ्यापैकी पटसंख्या संख्या असून शिक्षकच नसल्याची स्थिती आहे.
केंद्राकडून (Central Government) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून राज्याचा शिक्षणाचा दर्जा खालावला आसल्याचे स्पष्ट संकेत आले असून खालावल्याचं वास्तव समोर आलं आहे.
अव्वल स्थानी असलेली राज्याची शिक्षण व्यवस्था ही थेट सातव्या क्रमांकावर गेली आहे. राज्यांतील रायगड जिल्ह्यांतील म्हसळा तालुक्याची शैक्षणिक आवस्था पूर्णपणे ढेपाळली आसल्याचा दावा तालुक्यांत होत आहे. बदली झालेले शिक्षक सोडणे. बदलीने तालुक्यात- येणारे शिक्षक न येणे हा शिक्षण विभागाच्या अकार्यक्षमतेचा किंवा अपयशाचा भाग आहे.
महादेव पाटील , माजी सभापती पंस. म्हसळा
Post a Comment