खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळा चा विद्यार्थ्यां गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

टीम म्हसळा लाईव्ह 

खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, (मुंबई) (रजि.) च्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन सोहळा सुषमा पाटील विद्याल कामोठे येथे आयोजिन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत १० वी व १२ वी बोर्ड आणि पदवीधर तसेच पदव्युत्तर परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रजि. मंडळाचे अध्यक्ष सन्मा. श्री. हरिश्चंद्रजी पयेर, रजि. आणि मंडळाचे सचिव  सन्मा. श्री. यशवंतजी  शितकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यातआले होते.  प्रमुख पाहुणे मा. श्री. अरुणकुमार भगत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 


तसेच समाजसेवक श्री. प्रदिप गजानन भगत, मा. श्रीमती अरुणाताई प्रदिप भगत , माजी नगरसेवक . श्री. विकास घरत मा. सभापती, प्रभाग क्र. ११, माजी नगरसेवक मा. श्री. दिलीप पाटील माजी नगरसेवक मा. श्री. विजय चिपळेकर, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. सचिन विश्वनाथ तांबोळी मा. श्री. रविंद्र जोशी शहर अध्यक्ष, कामोठे आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


सदर कार्यक्रमास सन्मानिय प्रमुख अतिथी मान्यवर माजी नगरसेवक मा. श्री. अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका मा. श्रीमती कुसुम म्हात्रे  माजी नगरसेवक मा. श्री. गोपीनाथ भगत, माजी नगरसेवक मा. श्री. विकास घरत,मा. श्री. रविंद्र जोशी शहर अध्यक्ष, कामोठे माजी नगरसेविका मा. श्रीमती हेमलता गोवारी, युवामंच सेक्टर २२ चे अध्यक्ष  मा. श्री. सचिन नारायण यमगर आणि माजी नगरसेविका मा. श्रीमती शिला भाऊ भगत आदी उपस्थित होते.


खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळाचे स्थानिक पदाधिकारी  वतीने अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र कृष्णा पयेर, सचिव श्री. यशवंत नथुराम शितकर, खजिनदार श्री. प्रदीप विठ्ठल खोत तसेच स्थानिक पदाधिकारी  बाळकृष्ण माळी,  मनोज माळी आणि सहकाऱ्यांनी मिळून कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत शितकर व गिरीश पाटील यांनी केले.



सदर कार्यक्रम समाज मंडळ खरसईचे अध्यक्ष सन्मा.श्री काशिनाथजी रामा पयेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कार्यक्रमास कामठे विभागातील समाजसेवक आणि कार्यसम्राट नगरसेवक नगरसेविका तसेच खरसई आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून तरुणांना मार्गदर्शन करत आले आहे यापुढेही आणखीन उपक्रम सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे रजि. मंडळाचे अध्यक्ष सन्मा. श्री. हरिश्चंद्रजी पयेर यांनी सांगितले





 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा