(म्हसळा प्रतिनिधी)
12 ऑगस्ट राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी ग्रंथालयाचे असलेले महत्व
ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. ग्रंथालयांचा विकासात डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे.
त्या निमीत्ताने म्हसळे सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथपालांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर अंतुले विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. आर. एस. माशाळे, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल श्री उदय करडे , सहाय्यक ग्रंथपाल श्रीमतीसायली चोगले यांचा ग्रंथालयाचे अध्यक्ष संजय खाबेंटे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आज संपूर्ण देशात डाॅ एस.आर रंगनाथन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते भारतातील ग्रंथालय चळवळ उभी करण्यात रंगनाथन यांची भूमिका मोलाची आहे .या चळवळीला रंगनाथन युग असेही संबोधले जाते.
Post a Comment