म्हसळा - प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर
प्रशासनाची तसेच जनसामान्यांची जबाबदारी स्वीकारून महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या 'महास्वराज्य अभियान' यामध्ये जिल्ह्यात श्रीवर्धन उपविभागाने उत्कृष्ठ कामगिरी केल्यामुळे उपजिल्हाधिकारी अमित शेडगे, म्हसळा तहसीलदार समीर घारे आणी श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांनी उत्कृष्ठ काम केल्याबद्दल कोकण आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याकडून त्यांना सन्मानीत करण्यात आले.
म्हसळा तहसीलदार समीर घारे यांनी लोकाभिमुख, गतिमान आणी पारदर्शक कामासाठी योगदान दिले असून क्रीडा आणी सांस्कृतिक स्पर्धा २०२२, अमृतमहोत्सवी वर्षात बाईक रॅली, ध्वज वाटप, शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप, सैनिकांचा यथोचित सत्कार, शासनाच्या विविध योजना प्रभाविपणे राबऊन कोरोना काळात, अतिवृष्ठी काळात दरड ग्रस्त भागांना भेटी देऊन शिधावाटप करणे अशा अनेक लोकोपयोगी योजना तहसीलदार समीर घारे यांनी राबविल्या आहेत. तहसीलदार घारे यांना सन्मानित केल्याने तालुक्यात सर्वत्र त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.
Post a Comment