● मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नेत्यांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन
● रस्त्याच्या समस्येसाठी रायगड प्रेस क्लब उतरली रस्त्यावर..
● लोकप्रतिनिधींचे आर्थिक हितसंबंधच मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेला कारणीभूत - एस.एम.देशमुख
● आता रायगड प्रेस क्लबचे आंदोलन प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या दारात होणार !
म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर
मागील 15 वर्षांपासून रखडलेला कोकणच्या समृद्धीचा महामार्ग कधी पूर्ण होणार..? असा उद्विग्न सवाल आता कोकणची जनता सरकारला विचारू लागली आहे. कोकणातील जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम व रस्त्याची वडखळ ते इंदापूर पर्यत झालेल्या दुरावस्थेच्या विरोधात बुधवार, दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी वाकण फाटा येथे बोंबाबोंब आंदोलनाचे आयोजन केले होते.
आंदोलनात सहभागी झाल्याचे क्षणचित्र..
निडी येथे पडलेल्या मोठ्या खड्ड्याचे ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन सुरु असताना रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी या चिखलयुक्त खडुयात बसून आपला राग व्यक्त केला. त्यांच्या या अनोख्या आंदोलनात रोह्याचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांनीही सहभाग घेत या खडुयांमध्ये झाडांची रोपे लावून त्यांना खासदार आमदारांची नावे दिली. या रस्त्याप्रति असलेल्या निष्क्रियतेसाठी कोकणातील लोकप्रतिनिधीना १० हजार एस एम एस पाठविण्यात आले आहेत.
Post a Comment