म्हसळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार : असंख्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुस्लीम कार्यकर्ते शिवसेनेत डेरे दाखल.



पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची मुस्लीम समाजावरील निष्ठा आणि समाजाचे पारदर्शक काम यामुळे पक्षप्रवेशाचा दावा.

(म्हसळा प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक  सुभान इक्बाल हळदे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटा मध्ये जिल्हा प्रमुख   अनीलजी नावगणे  यांच्या प्रमुख उपस्थितीत  (उबाठा ) शिवसेना पक्षा वर विश्वास ठेवून व त्यांची मुस्लिम समाज मंडळीवर असणारे पारदर्शक प्रेम निष्ठा लक्षात घेता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा मध्ये जाहीर प्रवेश करीत आसल्याचे खुले करत बहुतांश मंडळीनी प्रवेश केला. यावेळी म्हसळा शहरातील कॉंग्रेसचे प्रमुख आणि राजकीय आभ्यासक नदीमभाई दफेदार आणि तालुक्यांतील आणि शहरांतील असंख्य मुस्लिम समाजाचे कार्यकर्तानी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला, या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा पक्ष प्रमुख अनिल नवगणे, दक्षिण रायगड प्रमुख नंदू शिर्के,  क्षेत्र संघटक माजी सभापती रवींद्र लाड, नगरसेवक  अनिकेत पानसारे, तालुका प्रमुख कुडेकर,नगरसेविका श्रीमती राखी करंबे,रिमा महामुनकर, निशा पाटील, बाळकृष्ण म्हात्रे, राजू सावंत,अमित महामुनकर ,गणू बारे, कौस्तुभ करडे, राहुल जैन, दिपल शिर्के,अजय करंबे, हेमंत नाक्ती,म्हसळा तालुका अल्पसंख्यांक प्रमुख शौकत हजवाने, इम्रान पनवेलकर, शिंदे, रोशन पाडावे, अनिल काप अजय कांबळे , राजाराम तिळटकर, रमेश खोत पदाधिकारी व आसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा