टीम म्हसळा लाईव्ह
अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँक या बहुराज्य शेडूल्ड बँकेत 38 वर्षे विविध पदावर काम करून सौ शुभदा पंडित यांना नुकतीच सेवानिवृत्ती झाली सौ पंडित यांनी बँकेच्या नवी मुंबईतील सर्व शाखांमध्ये काम केले आहे त्यांनी बँकेत काम करीत असताना समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडवले आहेत
पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे कार्याध्यक्ष श्री यशवंत मोकल.सेक्रेटरी राष्ट्रीय खेळाडू श्री अरुण पाटकर आणि सुभाष टेंबे यांनी सौ शुभदा माधव पंडित यांचा त्यांचे निवासस्थानी , पनवेल येथे जाऊन शाल श्री फळ व भेटवस्तू देवून हृद्य सत्कार केला आणि पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असो सिएशन रायगड चे वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले .
Post a Comment