म्हसळयांत ६५ वर्षीय अंध आजीबाई घरातून बेपत्ता : शोधा शोधी नंतर शेजाऱ्यानी घेतली पोलीसांत धाव



(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी येथील ६५वर्षीय अंध आजीबाई बेपत्ता झाल्याच्या  घटनेची नोंद दुर्गवाडी येथील धोंडू गणपत बांद्रे वय६९ या शेजाऱ्याने पोलीसाना दिल्याने म्हसळा पोलीसानी बेपत्ता मनुष्य रजी. ८/२०२३ दा. ता.वेळ दि.७ ऑगस्ट रोजी नोंदविला आहे. गौरी गणपत जांभळे या ६५ वर्षाय आजी शनीवार दि.५/८/२०२३ रोजी रात्री ९च्या दरम्यान चालता येत नसताना आणि अंघ असूनही घरांतून घासत- घासत बाहेर गेल्याचे सुशिला धोंडू कावीणकर या देखभाल करणाऱ्या बाईनी सांगितले.आद्यापपर्यंत आजीचा पत्ता लागला नसल्याचे तपासी अधिकारी सहा.फौजदार आर.पी. म्हात्रे यानी सांगितले. बेपत्ता महीलेचे वर्णन पुढील प्रमाणे रंग गोवर्णीय, उंची ४ फुट, चेहरा उभट , सरळ नाक , डोळे आणि केस काळे, मळकट रंगाची नऊवारी साडी, फिकट राखाडी ब्लाऊज असे वर्णन असून आशा वर्णनाची महीला दिसून आल्यास दूरध्वनी क्रंo2149 232240या क्रमांकावर फोन लाऊन माहीती द्यावी असे सहा. फौजदार आर.पी.म्हात्रे यानी आवाहन केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा