न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसळा विद्यालयात डॉ. बापूजी साळुंखे यांचा ३६ वा स्मृतिदिन मोठ्या उत्सवात पार पडला.



(म्हसळा- प्रतिनिधी)
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसळा विद्यालयात डॉ. बापूजी साळुंखे यांचा ३६ वा स्मृतिदिन मोठ्या उत्सवात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन  समीर बनकर हे होते, "ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने ज्ञानाचा दिवा व तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचवण्याचं कार्य बापूजींनी केले असे बनकर मनोगतात म्हणाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक कॉलेज,म्हसळा,माजी प्राचार्य  मच्छिंद्र जाधव साहेब मनोगतात म्हणाले, "बापूजींनी गरिबीवर मात करून शिक्षण पूर्ण केले, शिवाय त्याचे महत्त्व पटवून दिले". यावेळी श्री स्वामी विवेकानंदाच्या वेशभूषेत  कु.स्वराज संतोष उद्धरकर ,बापूजींच्या वेशभूषेत कु.आर्यन कळस व संस्थामाता वेशभूषेत कुमारी रुची गाणेकर हे विद्यार्थी आले होते. त्यांनी वेशभूषा करून कार्यक्रमात नाविन्यता आणली. त्याचबरोबर कुमारी लावण्या साळुंखे,दिया ओसवाल, सलोनी जयस्वाल, कु.सागर गुप्ता .स्वामी करंबे, अथर्व गायकवाड,प्रतिक जाधव या विद्यार्थ्यांनी बापूजींच्या जीवनावर व शिक्षकांमधून श्री वसावे एस. ए. व प्रा.चव्हाण सरांनी मनोगत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गायकवाड सर आणि सूत्रसंचलन श्री मुंडे सर यांनी केले . श्री सहारे सर व गीतमंच यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी श्री पाटील ई.सी, प्रा.सौ देवगावकर मॅडम,सौ. हाके मॅडम,जमदाडे मॅडम,मोरे सर, आदी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर  कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मृतीदिनानिमित्त शहरातून भव्य रॅली काढून घोषणा देण्यात आल्या. उपस्थितांचे आभार.  शिर्के मॅडम यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा