Accident : पुणे दिघी राष्ट्रीय महामार्गावर मॅक्झीमो टेपो आणि मोटरसायकल धडक ; दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी



(संजय खाबेटे,म्हसळा)
पुणे- दिघी  राष्ट्रीय महामार्गावर आयटीआय (वरवठणे) जवळ मॅक्झीमो टेपो क्रं M.H.06 B.W.7510 आणि मोटर सायकल (डिस्कव्हर) क्रं .M.H .06 B.F.1104 यांची ठोकर झाल्याने अपघात झाला.अपघातात मोटर सायकल स्वार अरबाज शाहबाज किल्लेदार वय वर्ष २२, फुझेल अशफाक तालीब वय वर्ष १७ (दोघेही रा. वरवठणे) गंभीररीत्या जखमी आहेत . दोघानाही डी.वाय.पाटील हॉस्पीटल वाशी नवी मुंबई येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आसल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले. अपघात शनीवार दि २ सप्टे रोजी सायं ४वा. झाला अपघाताची नोंद गु र.न ११३ /२०२३ भा.द.वि.क २७९,३३७,३३८, ४२७ मोटरवाहन अधिनियम १९८८ ,८४ प्रमाणे दाखल केला आसल्याचे तपासी अंमलदार एस.ए. विघ्ने  यानी सागीतले. अपघातांत दोनीही वाहने दिघीच्या एकाच  दिशेने जात होती.मॅक्झीमो टेपोने  मागाहून येणाऱ्या वाहनाना कोणत्याही सूचना अगर सिग्नल न देता टेंपो अचानक उजवीकडे वळविल्या मुळे मागिल दुचाकी स्वार मॅक्झीमो टेपोवर जोरदार आदळले , यामध्ये फुझेलला हाताला किरकोळ  तर पायाला गभीर दुखापती , तर अरबाज चे डावा पाय आणि डोक्याला  गंभीर दुखपती झाल्या आसल्याचे विघ्ने  यानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा