टीम म्हसळा लाईव्ह
रायगड जिल्हा परिषद शाळा आदगाव. येथे , गुरुवार दि. १० ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष मा. सुबोध शेठ जाधव साहेब यांसकडून शाळे साठी इलेक्ट्रॉनिक बोर्ड आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वह्या) आणि छत्री वाटप झाले.
या वेळी सर्व शाळेचे शिक्षक तसेच मुख्याध्यापक आणि शाळा समिती चे अध्यक्ष आणि सरपंच आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहाच्या वातावरणात शाळेतल्या मुलांनी आणि शिक्षकांनी सहकार्य केले.सन्मा. शिक्षक वर्गाने सर्वांचे आभार मानले. मनसेचे तोंडलेकर साहेबांनी शाळेचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांची शिस्त शाळेची स्वच्छता आणि सर्वांगीण गोष्टींवर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी देखील सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे द. रायगड उप जिल्हा अध्यक्ष मा. मृदास भाई तोंडलेकर , श्रीवर्धन तालुका अध्यक्ष मा. सुशांत भाई पाटील,महिला तालुका उपाध्यक्षा श्रीमती. प्रतीक्षा चौलकर, तालुका उपाध्यक्ष श्री.भूषण परकर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना श्रीवर्धन अध्यक्ष कु.स्वरूप नाईक सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment