अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी येथील प्रणव राजेश तोडणकर याची परभणी मेडीकल कॉलेज येथे MBBS शिक्षणासाठी निवड झाली आहे. प्रणवचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे.
पहिली ते चौथी शिक्षण रायगड जिल्हा परिषद शाळा कोंडविली, ता. श्रीवर्धन तसेच पाचवी ते दहावी शिक्षण रविंद्र ना. राऊत माध्यमिक विद्यालय, श्रीवर्धन तर 11वी व 12वी शिक्षण हे गोखले एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय आराठी ता. श्रीवर्धन या ठिकाणी झाले आहे. त्याने हे यश कोणत्याही कोचिंग क्लास न लावता मिळविले आहे. इंग्रजी शाळेत गेल्यावरच डॉक्टर होता येते ही गोष्ट पुन्हा एकदा चुकीची आहे हे त्याने दाखवून दिले. प्रणव हा लहानपणापसूनच बुद्धिमान होता. आणि लहानपणी पाहिलेले स्वप्न आता त्याचे पूर्ण होईल.
शहरात NEET परीक्षेसाठी लाखो रुपयांची क्लासेस लावली जातात. परंतु प्रणव ने ऑनलाईन व्हिडिओ पाहून NEET ची तयारी केली. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post a Comment