गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सात गावांनी मिळून स्वच्छता मोहीम राबवली आहे. धनगरमलई मुख्य मार्गावर झाडे झुडपांचे पसरलेले साम्राज्य दूर करून रस्ता सुस्थितीत केला आहे. या स्वच्छतेतून रहदारीचा मार्ग आता मोकळा केला आहे.
पावसाळ्यात रस्त्या लगतची झाडे झुडुपे वाढल्याने अपघाताची शक्यता होती. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधून स्वछतेसाठी सात गावांनी सर्वानुमते निश्चय करत पुढाकार घेतला. रस्त्याच्या दोन्ही बाजूस काटेरी झुडपांची वाढ असल्याने प्रवास करताना प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे सरपंच विजय पाडावे व उपसरपंच मिलन काते यांनी स्वछतेची मोहीम राबवली आहे. या उपक्रमात नागलोली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment