( म्हसळा प्रतिनिधी)
शेकाप युवा अध्यक्ष निलेश मांदा डकर यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टी म्हसळा पक्षात इनकमिंग सुरु झाले असून कार्यतत्पर, सुस्वभावी, व्यक्तिमत्व असणारे खरसई ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट लोकप्रिय माजी सरपंच निलेश मांदाडकर यांनी मुंबईतील बीजेपी मुख्यालयात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांतशेठ ठाकूर, महेश बालदी,प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील,नेते सतीश धारप, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ध्येर्यशील पाटील, उत्तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, म्हसळा तालुका भाजपा अध्यक्ष प्रकाश रायकर, छोटू दादा करडे, आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान मा नरेंद्र मोदी साहेब सर्व क्षेत्रांतील युवा वर्गासाठी करीत असलेले प्रयत्न आणि महाराष्ट्र सरकारचे विकासाचे धोरण यामुळे आकर्षित होऊन भाजपात प्रवेश घेतला आहे असे मांदाडकर यानी सांगितले . सोबत सामाजिक कार्यक्षेत्रातील चंद्रकांत खोत यांनीही सभा स्थळी येऊन मांदाडकर याना साथ दिली. सदर प्रसंगी महाराष्ट राज्य कार्यकारणी सदस्य रवी मुंढे, नाना महाले, म्हसळा तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश रायकर, सरचिटणीस महेश पाटील, तुकाराम पाटील, रमेश पोटले, प्रकाश कोठावळे, मनोहर जाधव, प्रशांत महाडिक, महादेव म्हात्रे, पत्रकार हेमंत पयेर आदी कार्यकर्ते व बहुसंखेने समर्थक उपस्थित होते.
"तालुक्यांत मागिल १५वर्षापासून शेकापक्षाचे ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती अगर जिल्हा परिषदेवर प्रतिनिघि निवडून आले नाही भविष्यांत श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यांतून शेकापचे अस्तीत्व संपुष्टांत येईल असा राजकिय निरीक्षकांचा अंदाज आहे"
Post a Comment