(म्हसळा प्रतिनिधी )
"माझी माती माझा देश" अभियान म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयांत आज दमदार आणि दिमाखात साजरा करण्यात आला, कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी असलेले माजी सभापतीआणि सामाजिक नेते महादेव पाटील यानी आपल्या मनोगतात वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे आणि व्यवस्थापक मंडळ, सर्व कर्मचारी आणि श्रोत्यांचे कौतुक केले, वाचनालयाने हुतात्मा दिन,अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त माझी माती माझा देश' अभियान ,राष्ट्रीय आदीवासी दिन असा उत्सवाचा सांस्कृतिक त्रिवेणी संगम साघत म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयांत कार्यक्रम दिमाखात साजरा झाला. या वेळी राष्ट्रीय आदीवासी दिन आणि हुतात्मा दिना निमीत्त विरसा मुंडा यांचे प्रतिमेंचे पूजन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे यांचे हस्ते, तर "माझी माती माझा देश'" याअभियाना निमीत्त . "भारत माते" च्या प्रतिमेचे पूजन म्हसळा तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील यांच्या हस्ते केले.पंचप्रण शपथ वायनालयाने अत्यंत कल्पकतेने करून हाथी स्थानिक माती आणि फुल घेऊन दोनीही "भारत मातेच्या" च्या प्रतिमेला अर्पण करून जमीन न विकण्याची शपथ घेतली , यावेळी म्हसळा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, पं.स चे कृषी आधिकारी मंगेश साळी ,ICDS च्या श्रीमती.व्ही.आर कलबासकर,श्रीम.रेणूका पाटील,दिपाली पालवे, पंचायत समितीचे 0s चंद्रसेन चौधरी , अकौंटंट श्रीमतीअलंका कोल्हे, अशोक पिंगळे ,रमेश दवटे , कनिष्ठ सहाय्यक अरविंद बैनवाड कृषी विभागाचे कनिष्ठ सहाय्यक डी.पी. सरनाईक ,जी एम केसकर,परशुराम नाक्ती ग्रंथपाल उदय करडे ,लिपीक सायली चोगले, सहायक प्राची मेंदडकर, वाचक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता . या वेळी ग्रंथालयाचे माध्यमातून अनेक ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते त्याचाही स्वाद उपस्थितानी घेतला.पहिल्या टप्प्यात दिनांक ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे या कालावधीत वाचनालय विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे सचिव काते यानी सांगितले.
Post a Comment