सोपान निंबरे : श्रीवर्धन कोलमांडला
तालुक्यातील कोलमांडला बागमांडला हरिहरेश्वर मार्गे पहाटे एसटीने रणाराऊत विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस विद्यालयाच्या ठिकाणी न सोडता डेपोत सोडत असल्याने विद्यार्थ्यांना शारीरिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. खेड्यांमध्ये माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसने पहाटे लवकर उठून तालुका मुख्यालय येथे ये-जा करत शिक्षण घेत आहेत. या मार्गाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रणाराऊत विद्यालयापर्यंत वेळेत पोहोचावे यासाठी पालकवर्ग नागरिकांची याआधी श्रीवर्धन आगार याकडे कायमस्वरूपी एसटीची मागणी करण्यात आली होती. याप्रमाणे एसटी अनेक वर्षे कोलमांडला येथून साडेसहा यावेळेस सुटून बागमांडला, हरिहरेश्वर, कालिंजे, निगडी, गालसुरे, जसवली या मार्गाने रणाराऊत विद्यालय येथे विद्यार्थ्यांना प्रवासफेरी देत होती. मागील एप्रिल-मे महिन्याच्या सुटीनंतर जूनमध्ये शाळा सुरू झाली, मात्र एसटी विद्यार्थ्यांना डेपोपर्यंत सोडत असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान व शारीरिक हाल होत आहेत. ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या या लाल परीच्या रुसव्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक वर्गासह विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.
Post a Comment