जनजागृतीसाठी म्हसळा पोस्ट ऑफीस आघाडीवर.
(म्हसळा प्रतिनिधी )
"ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या अधिकृत ट्विटनुसार " हर घर तिरंगा अभियान" , प्रत्येक घरात तिरंगा साजरा करण्यासाठी भारतीय पोस्ट ऑफिस देशभरातील 1.60 लाख पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रीय ध्वजांची विक्री करणार आहे. सरकार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा मोहीम राबवत आहे. पोस्ट विभागाच्या ई-पोस्ट ऑफिस सुविधेद्वारेही नागरिक राष्ट्रध्वज खरेदी करू शकतात. हर घर तिरंगा अभियान 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे."
ग्राहक ऑफलाइन तिरंगा सुध्दा खरेद करू शकणार
तिरंगा ऑफलाइन खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये तिरंगा फक्त 25 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. 25 रुपये प्रति नग या ध्वजाच्या विक्री किंमतीवर कोणताही जीएसटी लागू नाही. खरेदीदाराने वितरण पत्ता आणि ध्वजांची संख्या देणे आवश्यक आहे. ग्राहक सुरुवातीला जास्तीत जास्त 5 ध्वज खरेदी करू शकतो. आज म्हसळा पोस्ट ऑफी कर्मचाऱ्यानी म्हसळा मुख्य बाजारपेठ शहर , कन्या शाळा परिसर या विभागातून म्हसळा उपडाकपाल सौ प्रचिती कोलन यांच्या मार्गदर्शनातून सहाय्यक डाकपाल सौ मेघना कदम यांच्या नेतृत्वाने झेंडा रॅलीचे आयोजन करण्यात आले, शहरांत रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला चिखलप ब्रँच ऑफिस शिंदे, शुभम नाक्ती, अनिल गिऱ्हे,गोंडघर ब्रँच ऑफिस श्रद्धा कांबळे , केलटे ऑफिस संध्या मिंडे,कोलवट ऑफिस ऋतिका, खरसई ऑफिस म्हात्रे साहेब, शुभम चौधरी, साळवीन्डे ऑफिस जंगम, वरवठणे ऑफिस पूजा चांदोरकर, अनंत जंगम, खामगाव ऑफिस दिनेश पारावे मजगांव ताम्हाणे ऑफिस सौरभ गवते तळवडे ऑफिस वेदिका फुलझलके पाभरे ऑफिस गोविलकर यांचा सहभाग होता.
Post a Comment