म्हसळा ३१ जुलै २०२३ रोजी म्हसळा तालुक्यातील मॉडेल स्कूल रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा खरसई मराठी या शाळेतील १०० % विद्यार्थ्यांनी मॅसेज टू द मून - चंद्रावर निरोप या प्रथमच्या क्रिएटिव्हीटी मध्ये सहभाग नोंदविला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी चंद्रयान आधारित एखादे मॉडेल, चंद्रयान वर चित्र रेखाटणे , कलाकृती, टाकावू पासून टिकाऊ वस्तू,अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमात विद्यार्थी सहभागी होऊन खुप विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे फोटो, चित्र, मॉडेल फोटो,' लाइफ शिप ' या अंतराळयातून चंद्रावर पाठवले. जातील या पार्श्वभूमीवर शाळेने विद्यार्थ्याना या भूगोल विषयाबाबत व आधुनिक तंत्रज्ञान बाबत चिकित्सक पद्धतीने अभ्यास आणि निरीक्षणात्मक विचारधारेला वाव मिळाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृद्धीला वाढ मिळावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.
या उपक्रमाचे नियोजनासाठी विज्ञान शिक्षक श्री जयसिंग बेटकर सर यांनी बहुमोल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सहकारी शिक्षक राम थोरात सर आणि प्रल्हाद शेबांळे सर यांनी शैक्षणिक साधन सामुग्री साठी सहाय्य केले. आॅनलाईन सहकार्य करीता शिक्षक प्रेमी अजय पयेर यांनी बहुमोल सहकार्य केले. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मांदाडकर, मुख्याध्यापक शारदा कोळसे मॅडम, केंद्र प्रमुख किरण पाटील सर, विस्तार अधिकारी जगदीश घोसाळकर सर , गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड सर, टी. एन.ओ कौचाली सर यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.
Post a Comment