(संजय खांबेटे, म्हसळा प्रतिनिधी)
गौरी -गणपती सणाचे औचित्य साधून शिवसेना तालुका संघटना मेळावा म्हसळा सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाला.नव्यानेच नियुक्त झालेले शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या मेळाव्यास जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,श्रीवर्धन मतदार संघाचे क्षेत्र संघटक रविंद्रजी लाड,दिलीप करंदीकर,अनिल काप,माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के,मुकेश पवार,गजानन शिंदे,राजाराम तिलटकर,शहर प्रमुख अनिकेत पानसरे,नगरसेविका राखी करंबे,अनंत नाक्ती,राजू जाधव,दीपल शिर्के,कौस्तुभ करडे,संतोष सुर्वे,अजय करंबे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याचे निमित्त साधून म्हसळा तालुक्यात शिवसेना स्थापन झाल्यापासून संघटनेशी एकनिष्ठ राहिलेल्या बहुतांश शिवसैनिकांचा शाल,श्रीफळ, फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी शिवसैनिकांनी भविष्यांत संघटना वाढविण्याचे काम करावे ते सकारात्मक करताना संयम राखून काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. नवनियुक्त रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख संजय कदम यांनी सांगितले कि निसर्ग चक्री वादळा सारखी महाभयंकर वादळ येऊन गेली परंतू पृथ्वी आहे त्याच ठिकाणी ठाम पणे उभी आहे तिच्यावर काहीही परिणाम झालं नाही, त्याच प्रमाणे शिवसेनेवरही आजपर्यंत अनेक वादळ आली त्यामध्ये नारायण वादळ, भुजबळ वादळ अशी अनेक वादळ आली परंतू अश्या अनेक वादळाना उधळून लावण्याचे आणि सामर्थ्य पणे उभे राहून पक्ष वाढविण्याचे सामर्थ्य उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.तेव्हा शिवसैनिकांनी न डगमगता त्यांच्या मागे निष्ठेने ठामपणे उभे रहावे असे आवाहन केले. होणाऱ्या बंडाना उधळून लावण्याचे आवाहन केले. सध्याचे राज्य अळवावरच पाणी असून त्याचे थोडेच आहे, ते वर्षातच कोसळेल अस भाकीत संजय कदम यांनी वर्तविले.
यावेळी तालुका शिवसेनेच्या जडण- घडनीचे साक्षीदार असलेले जेष्ठ शिवसैनिक सदानंद शिर्के,दत्तात्रेय आंजर्लेकर, दादा पानसरे, श्रीधर महामूनकर, दत्ता सुर्वे यांच्या सह तालुक्यातील ३५ जेष्ठ शिसैनिकांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू शिर्के यांनी केले.
फोटो -म्हसळा येथील जेष्ठ शिवसैनिक सदानंद शिर्के यांना सन्मानीत करताना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, मेळाव्यास संबोधित करताना संजय कदम.
Post a Comment