म्हसळा प्रतिनिधी
कै.हरिभाऊ धर्मा पाटील. हे तळा तालुक्यातील रहाटाड गावातील सामाजिक सास्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असलेले नाव.त्यांनी गेली अनेक वर्ष रहाटाड गावाचे गाव प्रमुख होते.गावाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात श्री.गोपाळ कृष्ण भजन आणि नृत्य कलापथकाची स्थापना केली.आणि जिल्ह्यात रहाटाड गावाचे नावलौकिक वाढवले गावात अनेक गुणी कलावंत निर्माण करून पुढील पिढीला सांस्कृतिक सामजिक वारसा जोपासण्यासाठी संधी दिली. असे सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारे हरिभाऊ पाटील यांची १९८१ साली शेवट झाला.मात्र त्यांचा सांस्कृतिक वारसा जोपासणारे त्यांचे नातू श्री.खेलाराम पाटील यांनी त्यांची स्मृतीना उजाळा देण्याचे काम गणेशोत्सवकाळात “जीवनगाथा “कार्यक्रमच्या निमित्ताने करण्यात आला. श्री.खेलाराम पाटील यांनी आपल्या घराला त्यांचे नाव देवून संगीत भजन कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमाला गावातील आणि पंचक्रोशीतील अनेक संगीत क्षेत्रातील नामवंत शाहीर, गायक,कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.अनेक शाहिरांनी आपल्या गीतातून हरिभाऊ पाटील यांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. त्यामध्ये रामचंद्र पिसे, गोविंद बसवत. विठोबा कंबू,मोरेश्वर लासे,लक्ष्मन घमरी,गोविंद खुटीकर विठोबा धुमाळ,तुकाराम भगत, सुरेश लाशे रायगड भूषण म्हसळा तालुक्यातील श्री रामचंद्र म्हात्रे आदि शाहिरांनी गीत गायन करून रसिकांना जिंकून घेतले. यावेळी गावातील कार्यकर्ते रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Post a Comment