महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने १० वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा व ९ वी सब- ज्युनिअर मुले व मुली अजिंक्यपद स्पर्धा १५ ते १९ सप्टेंबर दरम्यान सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. यासाठी रायगड जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ व सब- ज्युनुअर मुले व मुली संघ निवडण्यात आले आहेत.
१ ली जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी दिनांक २८ ऑगस्ट रोजी नुकतेच खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पनवेल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व आगरी शिक्षण संस्थेचे मुख्याद्यापक मा.पंकज भागत सर यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेत रायगड जिल्हातील रायगड जिल्यातील सर्व सॉफ्ट टेनिस खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षा तथा पनवेल महापालिकेच्या मा. उपमहापौर सौ. सीताताई पाटील, सचिव स्वप्नील वारंगे स्पर्धा प्रमुख मंदार मुंबईकर यांच्या हस्ते झाले.
या निवड चाचणीतून निवड झालेले प्राविण्यप्राप्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
वरिष्ठ गट पुरुष संघ ः अश्विन प्रभू, आरूष निट्टुरे, निशांत गायकवाड, नारायण सब्रमणी, यश वारके, यश वारके, आदित्य मुंढे, विशाल खुटवड
वरिष्ठ गट महिला संघ ः प्रतीक्षा शेरकर, दीक्षा वालवे, काजल मंडळ, श्रुती बोणे, अदिती वारंगे, कीर्ती आसवले.
सब- ज्युनिअर मुले – राज बिसवास, स्पर्श पाटील, आकर्ष वाघमारे, प्रकाश गौतम, सिद्धेश कारंडे, आशिष गोड, सार्थक साळुंखे, मयूर निघोट, आदित्य भाबड, आदित्य तिवारी
सब -ज्युनिअर मुली – इरा अयाथान, साक्षी बोने, दुर्वा गोरडे, श्रावणी पाटील, अनिश्का वाशीकर, ख़ुशी जाधव
Post a Comment