म्हसळा - रायगड
श्रीवर्धन मतदार संघातील जनतेने तटकरे परिवारावर कायम जिव्हाळ्याचे प्रेम केले त्यामुळे खासदार सुनिल तटकरे यांच्या नंतर पक्ष प्रमुखांचे आशीर्वादाने मला श्रीवर्धन मतदार संघाची आमदार होता आले.अनेकांना चार,पाच वेळा आमदार होऊनही मंत्री होता येत नाही पण मला पहिल्याच टर्मला विविध खात्याचे मंत्री आणि रायगड जिल्हा पालकमंत्री होता आले हे माझे भाग्य असले तरी श्रीवर्धन मतदार संघाची पुंण्याई असल्याचे मत आमदार आदिती तटकरे यांनी म्हसळा आगरवाडा येथे"माझ्या स्वप्नातील गाव" नामफलकाचे अनावरण व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात व्यक्त केले.स्वदेश फाऊंडेशन मार्फत म्हसळा तालुक्यातील आगरवाडा ग्रामस्थ,मुंबई निवासी व स्थानीक महीला मंडळाचे अथक परिश्रमाने गाव स्वच्छ,स्वास्थ,सुंदर आणि स्वावलंबी ह्या चारसुत्री बाबी सत्यात उतरवत आदर्श गाव विकासासाठी ६२ प्रकारच्या नियमांत सहभाग घेत स्वप्नातील आदर्श गाव निर्माण केला आहे त्याचे अभिनंदन करताना आमदार आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुक्यात दोन चार स्वप्नातली आदर्श गाव होण्याऐवजी सर्वच गाव स्वच्छ, सुंदर आणि प्लॅस्टिक मुक्त झाली तर जिल्ह्यातच नाही तर देशात नामांकित होण्याची संधी प्राप्त होईल यासाठी स्वदेश आणि पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशा सूचना वजा आदेश दिले.या वेळी आयोजीत कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती महादेव पाटील,माजी सभापती छाया म्हात्रे,मा.उपसभापती संदिप चाचले,अंकुश खडस,जनार्धन पयेर,स्वदेश फाऊंडेशन संचालक प्रसाद पाटिल,तुषार इनामदार,शिवतेज ढवूल,कौस्तुभ कांबळे,महीला अध्यक्षा सोनल घोले,सरपंच इर्शत फकिह,गाव अध्यक्ष कानु नाक्ती,हरीचंद्र गाणेकर,लक्ष्मण गाणेकर,ग्राम विकास अध्यक्ष नारायण नाक्ती,प्रकाश गाणेकर,रियाजभाई फकीह,अनिल बसवत,गजानन जंगम,महेश घोले,अंकुश गाणेकर आदी मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी आदिती तटकरे यांनी स्वदेश फाऊडेशनच्या अनेक स्तुत्य आणि लोकपयोगी कार्यक्रमांत सहभागी होता आले याची आठवण करून दिली.आगरवाडा गावाच्या विकासात खासदार सुनिल तटकरे आणि आमदार म्हणुन मला हातभार लावता आले आहे. गावात अनेक उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुक करताना मला येथे सातत्याने येण्याची संधी मिळते याचा आनंद व्यक्त केला.आगरवाडा गाव प्रदुषण मुक्त करण्यासाठी गावात प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली आहे तसेच वापरातील प्लॅस्टिक रोजच्या रोज संकलन करून ते हरित फाउंडेशनकडे विल्हेवाट लावण्यासाठी देत असल्याची माहिती लक्ष्मण गाणेकर यांनी दिली.स्वदेश फाऊडेशनचे प्रसाद पाटील यांनी आदर्श गावाची व्याख्या विषद करताना देण्यात येत असलेले प्रमाणपत्र हे वर्षभरासाठी आसुन ते कायम टिकविण्यासाठी असलेले निकष पाळावे लागतील.स्वदेशने महीला बचत गटाचे माध्यमातून सक्षमीकरण,पाणी पुरवठा,शौचालय निर्माण,स्वच्छता,व्यवसाय प्रशिक्षण आदी लोकपयोगी कामात पारदर्शक काम केले असल्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र गाणेकर यांनी तर सुत्रसंचालन व आभार अंकुश गाणेकर यांनी मानले.
Post a Comment