संजय खांबेटे : म्हसळा
राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पणासाठी केंद्रीय रस्ते विकास व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे आले होते. केंद्रीयमंत्री येणार म्हणून शासकीय यंत्रणांनी महामार्गाच्या रखडलेली कामे उरकवण्यात आली. मात्र या घाई गडबडीत महामार्गाचे दिशादर्शक फलकावरील दोन तीर्थक्षेत्र गायब करताना "म्हसळा" तालुक्याचे नामकरण "म्हासळा" करून टाकल्याने हा प्रकार पर्यटक व स्थानिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रीय महामार्ग F७५३ असलेल्या पुणे-दिघी महामार्गावर माणगाव शहरातील मोर्बारोड चौकामध्ये महामार्गावरून श्रीवर्धन बाजूकडे जाणाऱ्या महत्वाच्या शहरांची नावे व अंतरे दर्शविण्यात आली आहेत.एका रात्रीत ही कमान बसविण्यात आली.मात्र या महामार्गावरून प्रवास करताना श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर व श्री सुवर्णगणपती असलेल्या दिवेआगर ही दोन पर्यटनस्थळे वगळण्यात आली आहेत.तसेच म्हसळा तालुका व शहराचा शब्द उल्लेख 'म्हासळा' असा करून एमआरडीसीने तालुक्याचे नामकरण केल्यामुळे हा विषय माणगाव तालुक्यात चर्चेचा ठरला आहे. पदपथाचे काम एका दिवसात पूर्ण केले,माणगाव शहरातील मोर्बा रस्त्यावरील पदपथाचे काम देखील एका दिवसात पूर्ण केले आहे. त्यामुळे कामाचा दर्जा नक्की कोणत्या प्रकारचा झालाआसेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवाय अतिक्रमण, कोर्ट केस, फॉरेस्ट अॅक्वी झेशन चा विचार करून नाईटणे ,बोर्ला, साई चेकपोस्ट (म्हसळा) , ही कामे तुटक-तुटक पद्धतीने अर्धवट करण्यात आली आहेत, म्हसळा ( Bypass), सकलप, तोंडसुरे हा सुमारे ५ कि.मी. चा रस्ता अद्यापही प्राथमिक स्वरुपांत असून काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याबाबत साशंकता आसताना उद्घाटनाचा घाट कशाला घातला अशीही चर्चा होत आहे.
"म्हसळा शहराला असणारा बायपास हा अद्यापही अर्धवट स्वरुपांत आहे, तो अर्पूण राहील्यास दिघी पोर्टच्या वाहतुकीचा प्रयंड ताण म्हसळा शहरांतील रस्त्यावर होणार आहे".
महादेव पाटील, माजी सभापती, पं. स. म्हसळा
" देशांतील राज्याचे पर्यटनाचे नकाशांत श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर व सुवर्ण गणपती असलेल्या दिवेआगर ही स्थाने महत्वाची भूमिका बजावत असताना दिशादर्शक फलकावर नावे प्राधान्यानेअसावीत".
श्री. उदय बापट,सरपंच दिवेआगर.
फोटो. म्हसळा ( Bypass), सकलप, तोंडसुरे मार्गे दिघी बंदर रस्त्याचे जंक्शन.
Post a Comment