म्हसळा प्रतिनिधी
८ एप्रिल २०२२ रोजी भापट येथील साने गुरुजी बालभवन वाचनालय येथे तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी म्हसळा तालुक्याचे तहसीलदार घारे साहेब यांनी वक्तव्य केले.
साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट या वाचनालयाला मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त १९ फेब्रुवारी २०२२ रोजी तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत एकुण ६० विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेत विजेते झालेल्या विद्यार्थ्यांना तालुक्याचे तहसीलदार मा श्री समिरजी घारे साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या होत्या , *गट क्रमांक १ (इयत्ता चौथी ते आठवी)*
१) श्रेयशी बालाजी माने - प्रथम शाळा सुरेश कुडेकर इंटरनॅशनल स्कुल म्हसळा
२) प्रिया प्रमोद भायदे - द्वितीय रा जि प शाळा तोंडसुरे
३) स्वरीत उमाकांत गुंडरे - तृतीय शाळा सुरेश कुडेकर इंटरनॅशनल स्कुल म्हसळा
४) श्रवण उमेश गिजे - तृतीय रा जि प शाळा देवघर कोंड
५) सेजल नामदेव नाक्ती - उत्तेजनार्थ शाळा तोंडसुरे
६) वेदांत राजेश पाडावे - उत्तेजनार्थ रा जि प शाळा सितपाचा कोंड
*गट क्रमांक २ (इयत्ता नववी ते बारावी)*
१) रोशनी रामचंद्र कुवारे - प्रथम ज्युनिअर कॉलेज म्हसळा
२) प्रतिक संतोष जाधव - द्वितीय न्यु इंग्लिश स्कूल नेवरूळ
३) निकिता विनोद जोशी - तृतीय ज्युनिअर कॉलेज म्हसळा
४) गौरव गणेश जाधव - उत्तेजनार्थ न्यु इंग्लिश स्कूल नेवरूळ
*गट क्रमांक ३ (खुला गट)*
१) अर्चना रविंद्र येलवे - प्रथम गाव ताम्हणे करंबे
२) योगेश यशवंत मेंदाडकर - द्वितीय गाव सखलप
३) रुपेश दिपक गमरे - तृतीय गाव आंबेत
४) नामदेव बाळू पवार - तृतीय ताम्हणे करंबे- म्हसळा
५) साईराज दत्तात्रय कांबळे - उत्तेजनार्थ सकलप
६) मेघश्याम हरिश्चंद्र लोणशीकर - उत्तेजनार्थ तोंडसुरे
*विशेष सहभाग*
१) तनिषा दिपक पाटील - सुरेश कुडेकर इंटरनॅशनल स्कुल म्हसळा
२) दिया जयसिंग बेटकर - रा जि प कन्या शाळा म्हसळा न १.
३) मनस्वी सुनील येले- राजिप शाळा कोळवट
४) आरुषी सुनील भोसले रा जि प शाळा कोळवट
अशा प्रकारे प्रत्येकी प्रथम क्रमांक ५०१/- द्वितीय क्रमांक ३०१/- तृतीय क्रमांक १५१/- उत्तेजनार्थ / विशेष सहभाग,१०१/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित तालुक्याचे तहसीलदार मा श्री समिरजी घारे साहेब होते. प्रमुख उपस्थिती आयु. प्रदिपजी मोहिते साहेब ( सचिव संस्कार विभाग बौद्ध महासभा दक्षिण रायगड जिल्हा), रायगड भूषण पुरस्कार प्राप्त मा श्री शंकरराव भिकु बेटकर, श्री सतीशजी शिगवण शिक्षण प्रेमी, प्रा.महंमद शेख सर, सरपंच श्री चंद्रकांत पवार,राजाराम तिलटकर, भाबट सजेचे तलाठी कलंबे तात्या, गाव विकास समिती अध्यक्ष प्रविण ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्या वंदना मोहिते, जेष्ठ समाजसेवक शाहिर भिमराव सुर्यतळ, श्री नथुराम घडशी, नामदेव मोहिते बौद्धजन मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण मोहिते, भापट मुंबई उपसेक्रेटरी रमेश अलिम, तोंडसुरे गावचे प्रमोद भायदे,कोळवट गावचे स्नेहल खेडेकर माध्यमिक शिक्षक रूपेश गमरे सर, प्राथमिक शिक्षक राहुल नाईक सर, मेघश्याम लोनशिकर सर,ठाकरे सर, दिलिप शिंदे,खटके सर, फुलझलके सर , शेख सर, अमित महागावकर, संजोजक जयसिंग बेटकर, दर्शना पवार प्राथमिक शिक्षिका माने मॅडम, अंगणवाडी सेविका जया बेटकर , रातिवणेच्या शेवंता शांताराम मोरे, नंदा मोहिते आदी मान्यवर , ग्रामस्थ व महिला मंडळ, वाचक, हितचिंतक, शिक्षण प्रेमी, युवक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री समिरजी घारे साहेब यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आजच्या पीढीला वाचन संस्कृतीची खुप आवश्यकता आहे. आणि ती आजच्या पिढीने जोपासली पाहिजे, शिक्षणाचे महामेरू महात्मा फुले यांच्या जीवनावर उदाहरणासह प्रकाश टाकला. सिंधु संस्कृतीवर सविस्तर माहिती दिली. जून सन २०२१ मध्ये साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट येथे एवढ्या दुर्गम भागात सुरू करण्यात आले यावेळी वाचनालय समुदायाचे कौतुक केले. माझे नक्कीच वाचनालय साठी नेहमी सहकार्य व मार्गदर्शन राहिल असे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रदिपजी मोहिते साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल वाचनालय टिमला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सुंदर ऐतिहासिक उदाहरणे देत.कार्यक्रमाला चांगलीच साथ दिली. शिक्षण प्रेमी सतिशजी शिगवण यांनी साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट येथे सुरू केल्याने भापट सह परिसरातील गावातील लोकांना, विद्यार्थ्यांना नक्कीच चांगला उपयोग होत आहे. विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध असल्याने गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. तसेच सरपंच राजाराम तिलटकर, प्राध्यापक महमंद शेख सर यांनी कौतुकास्पद मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला श्रमजीवी संस्थेचे प्रमुख हरेशजी कावणकर यांनी शुभेच्छा दिल्या. शिक्षण प्रेमी तथा समाजसेवक यांनी कांदबरी ग्रंथ संच वाचनालय ला भेट दिला. स्नेहल खेडेकर यांनी गौतम बुद्ध यांच्या जीवनावर पुस्तके भेट दिली, पाणदरे गावचे संतोष गोरिवले यांनी तुकाराम महाराज गाथा भेट दिली. समाजसेवक आयु प्रदिपजी मोहिते साहेब यांनी वाचनालय ला ५००१/- रू चे अर्थ सहाय्य केले. अतुल मोरे १००१/-, आयकॉन कॉम्प्युटर सेंटर म्हसळा चे सिकंदर आकलेकर सर यांनी वाचनालय ला योगदान दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे संयोजक श्री जयसिंग बेटकर सर यांनी केले. सुत्रसंचलन प्राथमिक शिक्षक अमितजी महागावकर सर यांनी केले. आभार प्राथमिक शिक्षक दिलिप शिंदे सर यांनी केले.
Post a Comment