संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुका ब्राह्मण सभेच्या बुध. दि.६ रोजी Adv स्वानंद दातार यांच्या निवासस्थानी झालेल्या सर्वसाधारण सभेत म्हसळा तालुका ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी भालचंद्र दातार यांची एकमताने निवड झाली.अनेक वर्ष कार्यरत असलेले भास्कराव जोशी यानी राजीनामा दिल्यामुळे दातार यांची नियुक्ती झाली.भालचंद्र दातार हे LI C चा व्यवसाय व सेवा कार्य करीत असतानाच तालुक्यात ख्यातनाम भिक्षूक म्हणून नावाजीले जातात . त्यानी तालुक्यात पं.भालचंद्र उर्फ भालू (गुरुजी) म्हणून वेगळे स्थान निर्माण केले आहे, ते जिल्हा ब्राह्मण सभेचे संचालक असून, म्हसळा तालुका हिंदू ग्रामस्थ आणि शहर हिंदू ग्रामस्थ मंडळात महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या निवडीमुळे ब्राह्मण समाजासह सर्व समाजांतून त्यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment