संजय खांबेटे : म्हसळा
तालुक्यातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या ठाकरोली गावी साकव बांधकामाचे भूमिपूजन,चंदनवाडी येथे डांबरी रस्ता भूमिपूजन आणि ठाकरोली ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश कार्यक्रमात पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबोधित करताना गावाचा विकास हा संघटीत झाल्याने होत असतो.पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील गावाची प्रगती आणि विकासकामे होण्यासाठी प्रयत्नशील असतात म्हणूनच सर्वांगीण विकासात महिलांचे योगदान तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगताना स्थानिक माहिलांचे पालकमंत्री तटकरे यानी कौतूक केले. तालुक्यातील जी गावे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत त्यांच्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही असे आश्वाशीत करून सर्व समाज घटकातील महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जाईल. म्हसळा तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाली असून शिवसेना,भाजप पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांचे विकास कामांवर प्रेरित होऊन पक्षांतर करीत आहेत. ठाकरोली गावाचे ग्रामस्थ,महिला, मुंबईकर तरुण मंडळीने पालकमंत्री आदिती तटकरे यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेऊन राष्ट्रवादीच्या विकास रथात सामील होत जाहीर प्रवेश केला.आदिती तटकरे यांनी अधिक सांगताना मुंबईकर मंडळीने गावाला फक्त सण उत्सव साजरे करण्याकरिता न येता सर्वांनी गावाच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे.गेली 35 ते 40 वर्षे गावात विकास होईल या आशेवर ज्या पक्षात विश्वास ठेवून राहिलात त्या पक्षाचे माध्यमातून विकास कामे झाली नाहीत त्या विकास कामांचा बॅकलॉग येणारे काही दिवसांत भरून काढू असे आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.पक्ष प्रवेश करताना गाव अध्यक्ष विनायक खेरटकर यांनी ठाकरोली गावाचा विकास अनेक वर्षांपासून रखडलेला आहे.आजूबाजूच्या गावांचा विकास खासदार सुनिल तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून होत आहे हे आम्हाला आता समजले आहे त्यामुळे तटकरे कुटुंबियांची विकास कामे करण्याची पद्धती पाहून आम्ही ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले. पक्ष प्रवेश कर्त्यांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती बबन मनवे,तालुका समन्वय समिती अध्यक्ष नाझीम हसवारे,तालुका अध्यक्ष समीर बनकर,मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, महिला अध्यक्षा रेशमा कानसे, माजी सभापती छायाताई म्हात्रे, माजी उपसभापती मधुकर गायकर,माजी उपसभापती संदिप चाचले,रियाजभाई फकीह,सतिश शिगवण,अनिल बसवत,संतोष सावंत,प्रकाश गाणेकर,सरपंच स्नेहा सोलकरआदी मान्यवर उपस्थित होते.
"गेले अनेक वर्ष आम्ही निष्ठेने एका पक्षांत राहीलो, परंतु आमच्या परिसरांतील बहुतांश गावांचा विकास होत असताना ठाकरोली गाव विकासापासून अनेक वर्ष रखडलेले राहीले. त्यामुळे आम्ही गावांचा विकास खासदार सुनिल तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून होईल हे नक्की करून आणि तटकरे कुटुंबियांची विकास कामे करण्याची पद्धती पाहून आम्ही सर्व ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत"
विनायक खेरटकर, गाव अध्यक्ष ठाकरोली (ता.म्हसळा)
Post a Comment