(म्हसळा प्रतिनिधी)
थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज सोमवार दि.११ एप्रिल रोजी सार्वजनिक वाचनालय म्हसळे येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरानी श्री सरस्वती आणि महात्मा जोतिबा फुले यांचे प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले. यावेळी तालुका गटशिक्षाधिकारी मंगेश साळी, कृषीविस्तार अधिकार एस.डी.शिंदे, विस्तार आधिकारी किशोर मोहिते, ग्रंथपाल उदय उर्फ बाळू करडे, श्रीम.सायली चोगले,श्रीम. दिपाली दातार,निलेशआबासाहेब साळवे, प्रकाश मंडवेकर,अनिल ठाकूर, नितीन माळीपरगे,अरविंद मोरे, पाटील,महेश खोले, व्यंकटेश नंदनवार, परशुराम चव्हाण, अशोक वाटव ,सावन घोडमहे,पी. एम. गायकवाड, श्रीम. रेणुका पाटील, श्रीम. व्ही. आर. कलबासकर, श्रीम. दिपाली पालवे, उपस्थित होते. उपस्थित मान्यवरानी साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. त्यांचे महान विचार आजही समाज मनावर सहज बिंबतात त्यानी पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईला शिक्षण देऊन तिला समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले, आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला,जोतिबा फुले यांची १०ते १५ पुस्तके प्रकाशित आहेत
अशी माहीती उपस्थितानी सांगून थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांना आभिवादन केले.
Post a Comment