म्हसळयांत महावितरणचा सावळा गोंधळ :म्हसळा तालुका शिवसेना आक्रमक.

फोटो :कार्यकारी आभियंता पटवारी याना निवेदन देताना तालुका प्रमुख व अन्य शिवसैनिक


( म्हसळा प्रतिनिधी)
राज्यांतील महावितरण कंपनी या ना त्या भलत्याच कारणानं सतत चर्चेत असतानाच ,आता म्हसळा तालुका शिवसेना संघटना म्हसळा महावितरण कंपनी विरुद्ध प्रचंड आक्रमक झाली आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये  वीज बिल कलेक्‍शनमध्ये (वसुली)म्हसळा तालुका  कायम वरच्या क्रमांकावर राहिला आहे. मात्र येथील जनतेला सुरळीत वीजपुरवठा देण्यात विद्युत वितरण कंपनी मात्र कायम खालच्या क्रमांकावर राहिले आहे. सतत खंडित होणाऱ्या विज पुराठ्याबाबत येथील जनतेने सनदशीर मार्गाने वेळोवेळी निवेदने केली. मात्र, याचा काडीमात्र फरक येथील कारभारावर पडला नाही. त्यामुळे येथील जनतेत वीज वितरण कंपनी बाबत चांगलाच असंतोष पसरला आहे.म्हसळा महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रांतील H.T. लाईन अनेक ठिकाणी कमकुवत झाल्यामुळे अनेक वेळा स्पार्किग होऊन वणवे लागतात त्यामुळे तालुक्याचे जंगल संपत्ती, खाजगी क्षेत्रांतील आंबा- काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणांत नुकसान होते त्याची नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त आहे, तालुक्यात महावितरण कंपनीचे अनेक ट्रान्स्फारमर उघडे आसल्यामुळे नागरिकाना धोक्याचे वाटते. ग्राहकांना आकारण्यांत येणाऱ्या दरांत सतत वाढ होत आसल्याने (उदा.डिपॉझीट ,इंधन आकार, दंड,व्याज ) सर्वसामान्य ग्राहकाना फार मोठा आर्थिक बुर्दंड सहन करावा लागतो. या बाबत तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, क्षेत्रसंघटक रविंद्र लाड,जेष्ठ शिवसैनिक शंकरराव कासार,बाळा म्हात्रे, अमीत महामूणकर,मुन्नाभाई पानसरे,कौस्तुभ करडे,विशाल सायकल, हेमंत नाक्ती,गणुशेठ बारे,अभय कलमकर,राजाराम तीलटकर, चंदु गाणेकर व शिवसैनिकानी कार्यकारी आभियंता पटवारी याना निवेदन देऊन म्हसळा करांच्या समस्या लौकरांत लौकर सोडवाव्या अशी आग्रही मागणी केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा