निरंकारी मिशनमार्फत देशभरात आयोजित 272 रक्तदान शिबिरांत उत्साहपूर्ण रक्तदान



पेण येथील रक्तदान शिबिरात 324 यूनिट रक्त संकलित

आपले जीवन सदोदित मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित असावे - सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज

महाड : प्रतिनिधी

मानव एकता दिवसानिमित्त रविवार, दि. 24 एप्रिल, 2022 रोजी संत निरंकारी मिशनमार्फत देशभरात आयोजित करण्यात आलेल्या 272 रक्तदान शिबिरांमध्ये निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले असून जवळपास 50 हजार यूनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. या महा रक्तदान अभियानामध्ये भाग घेत मिशनच्या झोन रायगड 40-अ च्या वतीने पेण येथील रक्तदान शिबिरामध्ये 324 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी रायगड जिल्हा रुग्णालय शासकिय रक्तपेढी अलिबाग व मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर रक्तपेढीने आपल्या टीम पाठविल्या होत्या.

देशभरात आयोजित करण्यात आलेल्या या महा रक्तदान अभियानाचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथून केला. प्रसंगी झूप ॲपच्या माध्यमातून सद्गुरु माताजींनी सर्व शिबिरांना सामूहिक रूपात आपले आशीर्वाद प्रदान करताना म्हटले, आपले जीवन सदोदित मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित राहील या भावनेतून आपण जीवन जगायचे आहे. की सेवा में प्रतिपल समर्पित हो हमारा जीवन, ऐसी ही भावना से युक्त जीवन हम सभी ने जीना है. सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की बाबा गुरबचनसिंहजी यांचे जीवन व शिकवण यांमधून प्रेरणा घेत आपण मानवतेच्या सेवेमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान द्यायचे आहे. याशिवाय सद्गुरु माताजींनी बाबा हरदेवसिंहजी यांच्या महान शिकवणूकीचाही उल्लेख केला, की रक्तदानाच्या माध्यमातून आपण मानवतेच्या सेवेत बहुमूल्य योगदान देऊन अनेकांचे प्राण वाचवू शकतो. एखाद्या शारीरिक कारणाने आपण रक्तदान करु शकत नसलो तरी रक्तदान करण्याची आमची मनोमन इच्छा असेल तरीही ती भावना स्वीकार्य आहे.

युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून विश्वबंधुत्व आणि एकोप्याचा संदेश जगभरात दिला. त्याबरोबरच समर्पित गुरु-भक्त महान सेवादार चाचा प्रतापसिंहजी व अन्य भक्तांचेही या दिवशी आपण स्मरण करतो, ज्यांनी मानवतेच्या भल्यासाठी आपल्या प्राणांचेही बलिदान दिले. मानव एकता दिवस प्रसंगी मिशनकडून दरवर्षी 24 एप्रिल रोजी संपूर्ण देशात सत्संगाचे कार्यक्रम आयोजित केले जातात शिवाय वर्षभर चालत राहणाऱ्या रक्तदान शिबिरांच्या विशाल श्रृंखलेचाही प्रारंभ केला जातो.

समालखा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सद्गुरु माताजींचे जीवनसाथी आदरणीय रमित चानना जी यांनी स्वत: रक्तदान करुन मानवतेच्या सेवेमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरले. हे सर्वविदित आहे, की संत निरंकारी मिशन नेहमीच मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठी केलेल्या सेवांबद्दल प्रशंसेस पात्र बनून राहिले असून कित्येक राज्यांकडून सन्मानित केले गेले आहे. जनकल्याणासाठी या सेवा निरंतर जारी आहेत. पेण येथील रक्तदान शिबीर प्रसंगी पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा