मद्यविक्री दुकाने तथा बारना देवदेवता,राष्ट्रपुरुष,संत महात्मे महान व्यक्ती, गड किल्ले यांची नावे नसावी राज्यांत शासनाचा आध्यादेश जारी



संजय खांबेटे : म्हसळा
राज्यातील अनेक मद्यविक्री दुकाने
तसेच त्या पद्धतीच्या  सेवा पुरवल्या जाणाऱ्या दुकान तथा बार ना  देवदेवता, राष्ट्रपुरुष, संत महात्मे महान व्यक्ती, गड किल्ले यांची नावे नसावी असा आदेश शासनाच्या गृह विभागाने नुकताच जारी केला असून अशा पध्दतीच्या दुकानानी (अस्थापनानी) ३०जून २०२२ पर्यंत अमलबजावणी करावी आशा सूचना संबंधीताना राज्याचे गृह विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
देशांत धार्मिक आचरणाचे प्रत्येकाला स्वातंत्र (मुभा)आहे. देशांत विविध जातीधर्माचे आचरण करण्यात येते मद्यविक्री  दुकान तथा बारचे नाव देवदेवता, राष्ट्रपुरुष, संत महात्मे महान व्यक्ती, गड किल्ल्यांची  ठेवल्याने त्यांची विटंबना होते. त्याशिवाय धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या जातात व वातावरण दूषीत होते यासाठी शासनाने राज्यामध्ये ज्या दुकानांतून मद्यविक्री तसेच त्या पद्धतीच्या सेवा पुरवल्या जाणाऱ्या दुकान तथा बारचे नाव देवदेवता, राष्ट्रपुरुष, संत महात्मे महान व्यक्ती,गड किल्ले यांची नसावी असे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा