डांबरी रस्ते असलेल्या भागात तापमान कमी; सिमेंटच्या रस्त्यांनी वाढवला म्हसळ्याचा पारा



रविवारी म्हसळ्याचा सॅटेलाईट तापमान 33 अंश मात्र रस्त्यावर 41 अंश तापमानाचा अनुभव


म्हसळा(निकेश कोकचा)


म्हसळा शहरासहित तालुक्यात बांधण्यात आलेले सिमेंटचे रस्ते तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत.झाडी,डांबरी रस्ते,नद्या असलेल्या ग्रामीण भागात शहराच्या  तुलनेत सुमारे 2 ते 3 अंश तापमान कमी असल्याचे आढळून येते.


म्हसळा शहरात मागील काही वर्षात अनेक कोटी रुपये खर्चून विकास कामे करण्यात आली.या विकास कामांमध्ये सिमेंटच्या रस्त्यांचा देखील समावेष आहे.म्हसळा शहरातून जाणाऱ्या पुणे दिघी काँक्रीट राष्ट्रिय मार्गाचे काम देखील पूर्ण झाले असून शहराचा तापमान वाढवण्यात या राष्ट्रीय मार्गाचा सिहाचा वाटा आहे.


उन्हाळ्यात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरून सूर्यप्रकाशाचे परावर्तन मोठ्या प्रमाणावर होते.त्यामुळे काँक्रीट रस्ते असणाऱ्या भागांत तापमान वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.या उलट डांबरी रस्ते असणाऱ्या भागात काही अंशतः तापमान कमी असते.


रस्त्याच्या दोनही बाजूला झाडे लावा
सिमेंट काँक्रीट रस्त्याचा दोनही बाजूंना जास्तीत जास्त झाडे लावल्यास तापमान नियंत्रणात राहील.झाडे लावल्यामुळे उन्हाळ्यात मारणारी उष्माघात झळीचे प्रमाण कमी होईल.



 माणगाव- दिघी राष्ट्रीय महामार्गा पेक्षा लोणेर श्रीवर्धन राज्य मार्ग उन्हाळ्यातही थंड

माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग हा संपूर्ण रस्ता उच्च दर्जाच्या काँक्रीटचा वापर करून बनवण्यात आलेला आहे.या रस्त्याचा दोनही बाजूना झाडांचा अभाव असल्याने रस्त्यावरून प्रवास करत असताना गरम वाऱ्याचे चटके लागतात. या उलट लोणेर श्रीवर्धन हा राज्य मार्ग डांबरचा वापर करून बनवलेला असून बहुतांश या रस्त्याच्या दोनही बाजुला झाडे आहेत.यामुळे या रस्त्यावर उन्हाचा प्रभाव कमी असून माणगाव दिघी रस्त्याच्या तुलनेत हा रस्ता थंड आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा