सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे सुरू करण्यात आलेल्या आभ्यासिकेचे "गरुडझेप" च्या विद्यार्थानी केले उत्साहात स्वागत.




(म्हसळा प्रतिनिधी)
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, संचलित गरुडझेप स्पर्धा परिक्षेचा आभ्यास करणाऱ्या विद्यार्थासाठी म्हसळा  सार्वजनिक वाचलनालय येथे आज बुधवार दिं.३० मार्च रोजी  अभ्यासिकेचे उद्घाटन तहसीलदार समीर घारे यांचे हस्ते सरस्वती व ग्रंथ  पूजनाने झाले. तहसीलदार घारे यानी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी डाॅ महेंद्र कल्याणकर साहेब यांच्या संकल्प नेतून तयार केलेल्या या  स्पर्धा परीक्षांचे व्यापक भूमिकेचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. सार्वजनिक वाचनालयाने ही सुसज्ज अभ्यासिका आपणाला उपलब्ध करून दिलेली आहे या शांततामय वातावरणात अनेक संर्दभ ग्रंथांचे सानिध्यात अभ्यास करून आपले करिअर घडवावे. संधीचा लाभ घ्यावा व स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राचा अर्थात रायगड जिल्ह्याचा मान उंचवावा असे भावनात्मक आवाहन केले. कार्यक्रमाला सार्वजनिक वाचनाल याचे संचालक प्रा.मशाळे M.lib , सुनिल  उमरटकर,नायब तहसीलदार के.टी.भिंगारे, महसूल नायब तहसिलदार धर्मराज पाटील, गटशिक्षणाधिकारी मंगेश साळी, प्राचार्य श्री.मोरे, ग्रंथपाल उदय करडे, दिपाली दातार, वनरक्षक (गस्तीपथक) श्रीमती वर्षा बोरसे, मांदाटणे सरपंच चंदू पवार, तसेच कु.प्राची माळी, आदिती मोहिते,किरण राजपूत, शंतनू शिपुरकर,मीनाक्षी जैन, प्रसाद दोडकूलकर,जय शहा हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संखेने उपस्थित होते. 
सार्वजनिक वाचनालयाचे संचालक प्रा. माशाळे  यानी आभ्यासिका उपलब्ध करून देणाऱ्या म्हसळा सार्वजनिक वायनालयांत फार मोठया प्रमाणात आणि दर्जेदार लेखकां ची  पुस्तके,नियत कालिके वृत्तपत्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा व या देशाचे सूज्ञ व सृजन नागरिक बनून देशाच्या प्रशासकीय पदापर्यंत पोहचावे.
 आपल्याअभ्यासाच्या नियोजनात समुह संवादाला विशेष महत्व देण्याचा कानमंत्र माशाळे यानी दिला. यावेळी आयोजकानी म्हसळा वन विभागात वनरक्षक (गस्तीपथक) पदावर नियुक्त आसलेल्या श्रीमती वर्षा बोरसे यांची Mpsc च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
वाचनालयाचे संचालक सुनीत्न उमरठकर यांनी गरुडझेप चे व्याख्यान निरंतर श्रवण करणे महत्वाचे आहे हे विद्यार्थाना सांगितले, शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख किशोर मोहीते यानी आभार मानले.




"सर्व सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्याना Mpsc Upsc साठी क्लास लावणे शक्य होत नाही , जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परिक्षांचे क्लास ,स्थानिक वाचनालयाचे माध्यमातून आभ्यासासाठी उपलब्ध साहीत्य, आभ्यासिका यामुळेच भविष्यांत आम्ही स्पर्धा परिक्षा देऊ शकणार आहोत" 
प्राची माळी (M.A) पुरातत्व (Archaeology)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा