म्हसळा बॅडमिंटन कलबच्या यजमानपदा खाली ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा संपन्न.



अलिबाग येथील सुजल गट्टे आणि युग सोनी यानी मिळवले विजेतेपद.
संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा बॅडमिंटन कलबच्या यजमानपदा खाली ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा म्हसळा तालुका क्रिडा संकुलन येथे नुकतेच संपन्न झाले. म्हसळा बॅडमिंटन कलब म्हसळा तर्फे आयोजित केलेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या  दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत अलिबाग येथील सुजल गट्टे आणि युग सोनी यांनी प्रथम तर म्हसळा येथील युसुफ अष्टीकर आणि अझेन कादिरी यानी उप- विजेते पद पटकावले.रोहा येथील निहार आणि मुसीफ यांनी तृतीय क्रमांक पटकवला. म्हसळा श्रीवर्धन सह जिल्ह्यांतील महाड,रोहा,आलिबाग व अन्य तालुक्यांतून ३२ संघ आले होते
विजेत्यांना दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच आकर्षक चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले.म्हसळा बॅडमिंटन कलब तर्फे म्हसळा क्रिडा संकुल येथे आयोजित केलेल्या ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इम्रान कादरी, मोहीत मेहता ,यतिन करडे ,सलमान पठाण , साद काझी ,अबीद , झोहेब तसेच सौ ज्योती ढापले व टिप टॉप गृप श्रीवर्धन यांनी विशेष सहभाग घेतला.ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा म्हसळा येथील क्लबनेअत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने केलेल्या नियोजनाने म्हसळा बॅडमिंटन कलबचे क्रिडा क्षेत्रात जिल्ह्यांत कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा