म्हसळा तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामे ठप्प.
५० कोटीची कामे ३वर्ष ठप्प. ग्रामस्थांच्या तक्रारीत वाढ
संजय खांबेटे : म्हसळा
राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्यामध्ये १० हजार किलोमीटर्स
ची काम शासन पूर्ण करणार आहे असे जाहीर करतानाच म्हसळा तालुक्यातील तीन ग्रामिण रस्त्यांची सुमारे ६.५० किलोमिटरची आणि रु४६३.४३ (लक्ष) चीकामे ३-४ वर्ष काम सुरूनसल्याच्या तक्रारी पालकमंत्री आदीती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे उपसभापती संदीप चाचले,सरपंच चंद्रकांत पवार,केतन आंग्रे,श्रीमती शिगवण,आणि परिसरांतील ग्रामस्थ करीत आहेत.
मंजूर रस्त्यांमध्ये म्हसळा तालुक्या तील घूम रुदवट पानवे रु १३९.४२ लक्ष,लांबी१.९५० कि.मी,सावर चिरगाव बौध्दवाडी रु२०२.४६ लक्ष,लांबी २.५०० कि.मि.पाष्टी- मोरवणे रु१२१.५५ लक्ष ,लांबी२.०० कि.मी, ही सर्व कामे शासनाने सुप्रभात इन्फ्रा प्रा.लि.अलिबाग याना२०१८-१९ मध्ये दिली आहेत त्याची किंमत रु४६३.४३ लक्ष आहे. ठेकेदाराने मागील ३ते ४ वर्षात यापैकी कोणतेही काम सुरु केले नसल्याने एजन्सी बदलण्याची मागणी ग्रामस्थ खासदार तटकरे यांचेकडे लावून धरत आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंर्तगत तालुक्यातील ढोरजे - कुडतोडी, श्रीवर्धन राज्य मार्ग ते जांभूळ बौद्धवाडी, पाभरे- चाफेवाडी-चिचोंडा हे सुमारे ११.८०५ कि.मी. लांबीचे रस्ते अन्य एजन्सीने योग्य कालावधीत पूर्ण केले आहेत.
"घूम रुदवट पानवे या रस्त्याचे ठेकदारावर टर्मीनेशन कारवाई बाबत वरीष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे, त्याचे मंजुरी मंतर अन्य प्रस्ताव सादर केले जातील"
श्रीमती जसवंती आवारे, A.E.E.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय माणगाव - रायगड
Post a Comment