संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा (जि. रायगड) ग्रामिण रुग्णाल यातील उपअधिक्षक विष्णु यशवंतराव संभारे यानी दोन भावांचे विवाह नोंदणी चे प्रमाणपत्र देण्याचे कामी रु२००० / हजार लाच मागणी तक्रारदार याचेकडे गुरुवार दि. १० मार्च रोजी केली होती, मागे पुढे करून अखेर रु१००० ची लाच स्विकारताना म्हसळा ग्रामिण रुग्णाल यातील उप अधिक्षक विष्णु संभारे याला लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले म्हणून ताब्यात घेतले आहे. लाच घेतल्याशिवाय मला विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळणार नाही याची खात्री झाल्याने संवंधीताने
अँन्टी करप्शन ब्युरोकडे रितसर तक्रार नोंदविली होती, तक्रारीच्या अनुषंगाने लोकसेवक लाचेची मागणी करीत आसल्याचे खात्री झाल्याने विष्णु सांभारेला लाचलुचपत विभागाने लाच स्विकारताना रंगेहाथ जेरबंद केले. सदर लाचेचा सापळा कारवाईत पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल घेरडीकर, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंध विभागा रायगडच्या पोलीस उप-अधिक्षक श्रीमती सुषमा सोनावणे,नवी मुंबईचे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गजराज बेंद्रे, सपोउपनि घरत,पोहवा अरुण कस्तुरे,महेश पाटील,विनोद जाधव, पोशि सचिन पाटकर यानी यशस्वीरीत्या सापाळा कारवाई केली.
Post a Comment