संजय खांबेटे : म्हसळा
जिल्हा पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस आधिकारी,पोलीस स्टेशनच्या हद्दींतील अवैध धंदे बंद करावे,अवैध धंद्याचे उत्पती स्थान ठरणाऱ्या, टपऱ्या, हायवेवरील अनधीकृत धाबे, ठराविक कार्यकाळानंतर उघडी असणारी हॉटेल्स बंद असावी असे मार्गदर्शन सातत्याने करत असतात तरी सुद्धा लपतछपत काहीअवैध धंदे चालू ठेवले जातात. त्यांचेवर जरब बसणेसाठी स्थानिक पोलीस स्टेशन कारवाई करीत असतात. त्याच प्रमाणे म्हसळा पोलीसानी नुकतीच म्हसळा होळी जवळील हॉटेलच्या परिसरांत मटका अड्डयावर धाड टाकली. म्हसळा पोलीस स्टेशनचे पो. कॉ. प्रकाश हंबीर याने दिलेल्या फिर्यादीवरून कुंभारवाडा परिसरातील वृद्ध इसमाला पोलीसानी मटका व्यवसाय करताना रंगेहाथ पकडले, संबंधीत मटका बुकीकडे मेन मटका असे लिहीलेले पावती पुस्तक ,रोख रु ८२०० असे आढळल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले सदर गुन्ह्याची नोंद म्हसळा पोलिसानी गु.र.नं. १३ मुं.जु. अधिनियम १२ अ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून आरोपीवर दंडात्मक कारवाई झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या गुन्ह्यामुळे म्हसळा पोलीसांचे स्थानिक महिलाकडून कौतुक होत आहे.
Post a Comment