म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळ ट्रस्टचे श्री स्वामी समर्थ धाम आणि श्री स्वामी समर्थ मूर्तीची प्राण प्रतिष्ठा संपन्न.



श्री स्वामी समर्थ मूर्तीच्या मिरवणुकीचे ठरले म्हसळाकराना आकर्षण.
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळ ट्रस्टचे श्री स्वामी समर्थ धाम जिर्णोद्धार आणि श्री स्वामी समर्थ मूर्तीची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली.रवीवार दि.२७ व सोमवार दिं२८ या दोन दिवस म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळाने मंदीर परीसरांत व गावांत धार्मिक संस्कारमय वातावरण केले होते.
रवीवार दि.२७ मार्च रोजी श्रीस्वामींच्या मूर्तीची श्री गणेश मंदीर,ब्राह्मणआळी,जैन कॉलनी,
प्रभू आळी, कुंभारवाडा,एस.टी. स्टँड परिसर, बाजारपेठ, सोनार आळी, तांबट आळी, दातार आळी, कन्या शाळा परिसर या भागातून ढोल -ताशाच्या गजरांत भगव्या पताका घेऊन मिरवणुक काढण्यांत आली.सोमवार दि.२८ मार्च रोजी प्रायाश्चित्त, मंडप प्रवेश,
शांतिपाठ,देवता नमस्कार,गणेश स्तुती,श्रीग्रामदैवत,भैरव मंडळ पूजन, रुद्र कलश पूजन,नवग्रह मंडळ पूजन,मूर्ती जलाधिवास, प्राणप्रतिष्ठा आरती आदींचे , आयोजन दापोली असूद येथील पुरोहीत पं. वैभव विजय जोशी व त्यांचे सहकाऱ्यानी मंत्र जागरा सह उत्कृष्टरीत्या पूर्णत्वाला नेले.
"स्वामिनी केली किमया आणि स्वताचे वास्तव्य केले तयार"
म्हसळा शहरांतील श्री लखमेश्वर मंदीर आणि परिसरांत असलेले निर्सगरम्य स्थळी सुमारे १६० वर्षाचे महाकाय वटवृक्ष २-३ जून २०२० च्या निर्सग चक्री वादळांत पडून  झालेल्या नुकसानीत सन २००३ साली बांधलेल्याश्री स्वामी समर्थ धाम (मठ) आणि श्री स्वामी समर्थ मूर्ती भंग पावली होती.निर्सग चक्री वादळांत शहरांतील बहुतांश घरे उध्वस्त झाली असताना भाविकांची घरे 
झाल्यावर मठाचा जिर्णोद्धार करू असा कौल आल्याने ग्रामस्थ मंडळी निश्चिंत होती, या कालावधीत मूळचे म्हसळ्याचे सध्या व्यवसायानिमीत्त वास्तव्य दापोली येथे आसलेले श्री.अशोक केरू पोतदारयानी ग्रामस्थांपुढे प्रस्ताव ठेवला मी श्री स्वामी समर्थ धाम (मठ)आणि श्री स्वामी समर्थ मूर्ती  प्राण प्रतिष्ठाकरून स्वामीना आणि ग्रामस्थाना सेवा अर्पण करीन असे सांगितले . श्री.अशोक केरू पोतदार पत्नी श्रीमतीअस्मिता अशोक पोतदार, जावई प्रशांत मोहन मुसलोणकर, मुलगी श्रध्दा प्रशांत मुसलोणकर या सर्वानी संकल्प पूर्ण केला, तब्बल दोन दिवसाचा विधीवत कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी शहर हिंदू ग्रामस्थ अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेट करडे, आणि संचालक सुनिल उमरटकर, नंदू गोविलकर,योगेश करडे,दत्ता हेगिष्टे,छोटूदादा करडे, सुशिल यादव, बाळा एडवी, श्रीमती भक्ती करडे, गौरी पोतदार,पुष्पा वाळवटकर आदी ग्रामस्थानी  कार्यक्रम यशस्वी केला. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा