स्त्रियांकडे सकारात्मक उर्जा अधिक असल्याने सर्व क्षेत्रात पुढे.-गीता जाधव (माजी महिला बालकल्याण सभापती)



तळा :किशोर पितळे
तळा तालुका प्रेस क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तळा तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे राजिप माजी महीला बाल कल्याण सभापती सौ.गीताताई जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ.अस्मिता भोरावकर, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, तळा प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय रिकामे, ज्येष्ठ सल्लागार पुरुषोत्तम मुळे, उपाध्यक्ष किशोर पितळे, सरचिटणीस डी.टी.आंबेगावे, खजिनदार विराज टिळक, सदस्या देवयानी मोरे, विराज टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.

          या कार्यक्रमात तळा नगरपंचायत नगराध्यक्षा
अस्मिता भोरावकर,निवासी नायब तहसीलदार सौ.स्मिता शिवाजी जाधव,प्र.गटशिक्षण अधिकारी सौ.सुरेखा मारुती तांबट,विरोधी पक्षनेत्या सौ.नेहा नमीत पांढरकामे,आरोग्य सहाय्यिका सौ.तनुजा पुरुषोत्तम मुळे,व्यवसायीका ,सौ.वर्षा संजय रिकामे, पोलिस कॉन्स्टेबल प्रियंका कुळसिंग वंजारी, उद्योजिका सौ संध्या रमेश कोलवणकर, कलाक्षेत्र सौ रुबिना शारिक परदेशी, अंगणवाडी सहाय्यिका व कलाक्षेत्र सौ प्रगती प्रकाश रिसबूड, पोलीस पाटील सौ निता नितीन पाटील, प्राथमिक शिक्षिका दिव्या दिनेश गायकर या महिलांना कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, प्रमुख पाहुणे गीताताई जाधव यांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

        सौ.गीताताई जाधव यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी तळा प्रेस क्लब यांचे अभिनंदन केले. त्यापुढे म्हणाल्या कि हा योग्य व्यक्तींचा सन्मान करणारा कार्यक्रम आहे. या व्यक्ती समाजामध्ये खऱ्या अर्थाने काम करत असतात. आणि अशाप्रकारे मान सन्मान मिळाल्यामुळे काम करायला ऊर्जा मिळते, हि मंडळी कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत असतात. मानवतेचे , समाजाचे खरे काम हे लोक करत आहेत. या व्यक्तींकडून आम्हाला शिकण्यासारखे आहे. तसेच त्यांनी सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदनही केले.स्त्रियांकडे सकारात्मक उर्जाअधिक असल्याने सर्व क्षेत्रात पुढे गेलेल्या दिसत आहेत. घटनेने स्त्रियांना अधिकार दिला असून प्रगती करावी स्त्रियांवर बंधनं लादण्यापेक्षा आपले विचार बदला. घरातून, समाजातून भक्कम पाठिंबा मिळाला, तर मुली आभाळाला गवसणी घालतायत. मग प्रत्येक दिवस महिला दिन असेल,असाआत्मविश्वास सन्मान करताना त्यांनी केला ज्या प्रमाणे यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो त्याच प्रमाणे यशस्वी स्त्री मागे पुरुषाचा हात असतो असे त्यांनी यावेळी सांगितले. 

अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत रोडे म्हणाले की.तळा     तालुका प्रेस क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन केले.त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.तालुक्यातील भगीनीचा सन्मान करताना आनंद वाटला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना 

निश्चितच एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान असून, स्त्री शक्ती जन्मापासूनच वेगवेगळ्या रुपात आपल्यावर संस्कार करीत असते ज्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर समाजात वावरताना होत असतो त्यामुळे आज हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचा विशेष आनंद होत आहे. त्यापुढे म्हणाले की, यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते', या पुरुषप्रधान संस्कृतीप्रीय वाक्‍याला मागे टाकत त्याच स्त्रीने पुरुषांनाही आम्हाला "ओव्हरटेक' केले आहे.आपणही पुढे जायचे...या जिद्दीने,चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ती धडपड करते आहे. ती व्यवसायात पाय रोवून उभी राहिली आहे. स्वतःतील कलाकौशल्यांना तिने पंख दिले आहेत. नवयुगात ती व्यावसायिक होते आहे, इतर महिलांच्या हातालाही काम देते आहे. महिला आरोग्य, फिटनेस, व्यसनमुक्ती अशा विविध विषयांत ती काम करतेआहे. अशा तळा तालुक्यातील महिलांच्या धडपडीची ही गोष्ट आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान होत आहे याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी केले तर आभार तळा प्रेस क्लबचे सचिव डी टी आंबेगावे सर यांनी मानले.

                 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा