(म्हसळा प्रतिनिधी)
१९फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर आज२१मार्च रोजी शिवसेना व युवासेना संघटनेमार्फत म्हसळा शहरांत शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली.शहरांतील
सर्वच शिवभक्त फार मोठया उत्साहांत मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत बाल शिवाजी आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील बाल कलाकारांचा सहभाग,सचिन करडेच्या गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानने किल्ले रायगड वरून आणलेली मशाल ज्योत व श्री शिव छत्रपतींची पालखी कार्यक्रमात कौतुकाची ठरली. मिरवणुकीत माजी विरोधीपक्ष नेते बाळशेठ करडे, तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर,नंदू शिर्के,रवी लाड, बाबू बनकर,योगेश करडे, उप नगराध्यक्ष सुनिल शेडगे, संजय कर्णिक,श्रीमती राखी करंबे,संजय दिवेकर, आमित महामुनकर, अभय कळमकर,विशाल साळुंखे, कौस्तुभ करडे,अजय करंबे, कल्पेश जैन,राहुल जैन, सुशिल यादव,बाबू शिर्के,यतीन करडे, प्रसन्न निजामपूरकर,श्रीमती कल्पिता करडे, नमू करडे, गौरी पोतदार, पूजा पानसरे आदी महीलांचा पारंपारिक वेशभूषेत सहभाग होता.तालुक्यात म्हसळ्यासह,गायरोणे,मेंदडी,
देवघर कोंड, कांदळवाडा,निगडी, खारगाव खुर्द,बनोटी,खरसई, वारळ,पेढांबे,सुरई,पाभरे, आगरवाडा,चिरगांव,नेवरूळ या गावांतूनही तिथीनुसार श्री शिवजयंती साजरी केल्याचे स.पो. नी. उद्धव सुर्वे यानी सांगितले.
Post a Comment