संजय खांबेटे : म्हसळा
श्रीवर्धन येथील मूळचे रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असणारे मंदार अरविंद जोशी यांनी शनिवार दिनांक १९ मार्च २०२२ रोजी सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन या संस्थेस मान्यवर लेखक व दर्जेदार प्रकाशकांची २५ ग्रंथांची बहुमोल अशी भेट दिली. श्रीवर्धन वाचनालयाला ११० वर्ष पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील आदर्श वाचनालय म्हणून नावाजण्यात येते. जोशी यानी दिलेल्या देणगीमुळे वाचनालयाचे ग्रंथ संग्रहात वाढ होणेस मदत झाली.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मनोज गोगटे, ग्रंथपाल संदीप माळी, मंदार जोशी आणि आप्तेष्ट,आणि बहुसंखेने वाचक उपस्थित होते. पुस्तकांमुळे वाचकाना चांगल्या प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले आहे. या त्यांच्या सहकार्याबद्दल वाचनालयाचे कार्यकारी मंडळ अत्यंत आभारी आहे असे गोगटे यानी सांगितले.
" वाचनालये आणि त्या संस्था जपत असलेल्या वाचन संस्कृती यामुळेच आम्ही वाचक म्हणून घडलो, आता वाचकानी विविध उपक्रम राबवून गाव- वाडीवरील वाचनालये सशक्त करणे गरजेचे आहे."
मंदार जोशी.श्रीवर्धन
Post a Comment