म्हसळयात ट्रान्सफार्मरच्या चोऱ्यांत वाढ :वाडांबा पाठोपाठ जांभूळच्या ट्रान्स्फारमरवर चोरट्यांचा डल्ला.



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यात नुकतीच जांभूळ येथे ट्रान्सफार्मर चोरीच्या घटनेची नोंद झाल्याचे म्हसळा पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार सुभाष पाटील यानी सांगितले. म.रा.वि.वितरण कंपनीचे अभीयंता अमोल पालवे यानी दिलेल्या फिर्यादी वरून म्हसळा पोलीसानी २३/२०२२ भा.द.वि. सं.३७९  प्रमाणे जांभूळ येथील ट्रान्सफार्मर चोरीच्या घटनेची नोंद केली.सुमारे २० हजार किमतीचा हा ट्रान्सफार्मर 63KVA क्षमतेचा Deltron Electricals या कंपनीचा आसल्याचे पालवे यानी फिर्यादींत म्हटले आहे. मंगळवार दि.८ मार्चच्या रात्री १ ते बुध दि.१६ मार्चच्या मार्चच्या सायं.३ ३oच्या दरम्यान ट्रान्सफार्मरची चोरी झाली अशी पालवे यानी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

"मागील २ वर्षांत तालुक्यांत  घरफोडया,भुरटया चोऱ्या आणि  ट्रान्सफार्मचोरीच्या ३ते४ घटना  झाल्या आहेत परंतु म्हसळा पोलीसां कडून या चोऱ्यांचा तपास न झाल्याचे समजते."

"रशीया -युकेन युध्दा मुळे सर्व प्रकारच्या मेटल आणि भंगारचे दर वाढले आहेत. ट्रान्सफार्मर मधील ऑत्युमिनीयम अगर तांब्याचे वायडींग आणि त्या मधील ऑईल वर चोरटे डल्ला मारतात"

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा