कुणबी समाजाचा मोर्चा एस.टी. प्रवाशांसाठी ठरला तारणहार.


म्हसळ्यात "बहुजन हिताय बहुजन सुखाय " चा कैवारी ठरला म्हसळा तालुका कुणबी समाज.
कुणबी समाजाचा मोर्चा  एस.टी. प्रवाशांसाठी ठरला तारणहार.
संजय खांबेटे : म्हसळा 
एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटीचे कर्मचारी २ नोव्हेंबर पासून सुमारे ४ महीने बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत. परिणामी एसटीची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांचे जिवनमानावर विद्यार्थाचे शालेय जिवनाससह टपाल व्यवस्थेवर ही झाला आहे.कुटुंबाचे आरोग्य व्यवस्था, रोजंदारी यासह सर्वच बाबींवर खाजगी वाहतुकीने खर्च वाढत चालला आसल्याने म्हसळा तालुका कुणबी समाजाने तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून शासनाकडे पर्यायाने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेंकडे एसटीची वाहतूक सेवा पूर्ववत सुरु करावी अशी आग्रही मागणी केली. समाजाचे तालुका अध्यक्ष महादेव भिकू पाटील,रामचंद्र सुरेश बोर्ले, गणेश सुरेश बोर्ले, दिलीप मांडवकर, मोहन शिंदे ,लक्ष्मण भाये, लहू तुरे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या मोर्चेकऱ्यानी महसूल नायब तहसीलदार धर्मराज पाटील यांचेमार्फत दिलेल्या निवेदनात केलेआहे.तालुक्यांत बहु संखेने कुणबी समाज असून बहुतांश समाज आर्थिकदृष्टया दुर्बल असल्याने कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना अडचणीचे ठरत आसल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या सरचिटणीस गणेश बोर्ले यानी सांगितले. मोर्चा मध्ये राजाराम तिलटकर, प्रभाकर बोर्ले, अनिल टिंगरे,अल्पेश अबगूल, मुकेश आंबेकर, महेंद्र धामणे, सहदेव खामकर, राजेश चव्हाण,सुरेश पाडावे, दगडू पाडावे या विभागीय प्रतिनिधींसह सुमारे ५०० ते६०० कुणबी समाजाची मंडळी सामिल होती.


"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्यासाठी एसटी महामंड ळाची पास मिळतो. त्यामुळे कमी दरात विद्यार्थ्यांना पास मिळत असल्याने शाळेसाठी हे सोयीचे होते. परंतु एसटी बंद असल्याने अशा विद्यार्थ्यांनाखासगी वाहनांशिवाय पर्याय उरलेला नाही. खासगी वाहनांचा वेळेचा कसलाही भरोसा नसल्याने शाळेतून घरी जायला वेळ होत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे."
श्रीमती मिना टिंगरे, अध्यक्ष कुणबी महिला मंडळ, रेवली

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा