राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकासाची दिंडीत आध्यात्मिक संस्कारअसलेले तोंडसुरे जंगम वाडी सामिल.
जंगमवाडी पंचक्रोशीचे विकासाला प्राधान्य देणार: खासदार सुनिल तटकरे
संजय खांबेटे : म्हसळा
महाशिवरात्री उत्सवाचे औचित्याने तोंडसुरे जंगमवाडी ग्रामस्थांच्या मनामध्ये गावाच्या विकासासाठी आलेल्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीचे माध्यमातून आम्ही सोडलेले संकल्प आज खऱ्या अर्थाने सिध्दीस जात आहेत. महिन्याभराचे कालावधीत तोंडसुरे जंगमवाडी येथील शिवकालीन महादेवाचे मंदीराचे लोकार्पण सोहळा जंगम समाजाचे आध्यात्मिक गुरू धारेश्वर महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत माझे हस्ते संपन्न झाला होता त्या वेळी मंदिर परिसर सुधारणा कामी १२लक्ष रुपयांची मंजुरीचे कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे. दिलेला शब्द पूर्ण केल्याने जंगमवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास रथात बसण्याचा निश्चय केला. तालुक्या तील तोंडसुरे जंगमवाडी सरपंचांसह संपुर्ण ग्रामस्थांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे विकासाची दिंडी आहे या विकासाचे दिंडीत भौतिक विकासा बरोबरच गावाचा आर्थिक आणि आध्यात्मिक विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याने तोंडसुरे सरपंच स्मिता जंगम,गाव अध्यक्ष सुधाकर जंगम यांचे सह संपुर्ण ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला या वेळी खासदार सुनिल तटकरे पुढे बोलताना माजी सभापती महादेव पाटील,भाजपा मधून आलेल्या महिला अध्यक्षा मीना टिंगरे,तालुका उपाध्यक्ष अनिल टिंगरे यांच्या पाठोपाठ तोंडसुरे जंगम वाडीने केलेला आजच्या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेल्या प्रवेशाने आपणांस मनस्वी आनंद झाला आहे यामुळे आम्हाला काम करण्याचे बळ मिळणार आहे.म्हसळा तालुक्यात पक्षाची ताकत आणि शक्ती देणारे ठरणार आहे.पुर्वीचे कालावधीत कळत न कळत आमच्या कडुन गावातील विकासाची काही कामे करण्याची राहुन गेली असतील परंतु यापुढे विकास कामात खंड पडणार नाही असे तटकरे यानी यावेळी आश्वाशीत केले.याच वेळी वरवठणे पेडांबे येथील उपसरपंच भिकु पाटील यांचे सह स्थानिक व मुंबई निवासी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.सर्व पक्ष प्रवेशकर्ते ग्रामस्थांचे खासदार सुनिल तटकरे यांनी स्वागत करताना या पुढे निवडणूक काळात पक्ष प्रवेशकर्त्या ग्रामस्थांनी पक्षाला झुकते माप देवुन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकित फक्त आणि फक्त घड्याळाचा गजर झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
Post a Comment