उद्याचे भविष्यात निगडी ग्रामपंचायतीची कोणतीही विकास कामे शिल्लक रहाणार नाही : खासदार सुनिल तटकरे.


संजय खांबेटे : म्हसळा 
तळा तालुक्याला जोडणाऱ्या म्हसळा तालुक्या तालुक्यातील निगडी खारगाव (बु) ग्रामपंचायतीतील पंचक्रोशीतील या भागातील मंडळीनी मागे काय झाले ह्याकडे दुर्लक्ष करून उद्याचे भविष्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे असे निगडी(ता. म्हसळा) ग्रामपंचायतीचे हद्दीतील आंगणवाडीचे उद्घाटन प्रसंगी खासदार सुनिल तटकरे यानी सांगितले यावेळी खासदार तटकरे यानी निगडी ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव भिकू पाटील, (काँग्रेस)गाव अध्यक्ष गणू बारे (शिवसेना)आणि माहिला मंडळ अध्यक्षा संगीता आंबेकर यानी विकास कामात मागणी केलेल्या ग्रामपंचायत इमारत, प्रवेशव्दारा जवळील वॉल कंपाँऊंड,शाळेजवळून जाणारा दगडघूम रस्ता,अंर्तगत रस्ते या सर्व निगडी करांच्या मागण्या पूर्ण करणार आसल्याचे खासदार तटकरे यानी अश्वासीत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे  तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदिप चाचले,माजी सभापती उज्वला सावंत,माजी सभापती महादेव पाटील,नगराध्यक्ष असहल कादरी,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,पं.स.सदस्य मधुकर गायकर, युवक अध्यक्ष फैसल गीते,नगरसेवक नासीर मिठागरे,सरपंच अनिल बसवत, रियाजभाई फकीह,किरण पालांडे, अनंत पाखड, महेश घोले, प्रकाश गाणेकर, महिला अध्यक्षा रेश्मा कानसे,मीना टिंगरे,अनिल टिंगरे,मनोज नाक्ती,गजानन जंगम,तुकाराम मांदाडकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. तटकरे यानी निगडी गावात मला महाशिवरात्रीच्या पावित्र दिवशी येण्याची संधी मिळाली ती सुध्दा आज विकास कामाच्या उद्घाटनासाठी हे माझ्यासाठी आणि निगडीकरांसाठी भाग्याचे आसल्याचे सांगत मोठया प्रमाणांत उपस्थित असलेल्या महीलांसाठी पालकमंत्री ना.आदीती ताई तटकरे यांच्या निधींतून माहिलां साठी सभागृह देण्याचे तटकरे यानी मान्य करतानाच यापुढे निगडींत विकास कामाचे भूमिपूजन -उद्घाटन -भूमिपूजन हे सुरुच रहाणार आसल्याचे तटकरे यानी सांगितले. महीलानी भविष्यात पर्यटन व्यवसायावर अधारीत कौशल्य विकास व्यवसाय करावा असे मार्गदर्शन करतानाच महीलानी मागे काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्याचा उषःकाल पहावा असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा