ग्रुप ग्रामपंचायत मांदाटणे ता. म्हसळा महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या योजना महिलासांठी तयार करण्याच्या दृष्टीने महिला वर्गाला संधी देण्याचा माणस ठेऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग गृप ग्राम पंचायत मांदाटणे अंतर्गत येणारी गावे पाणदरे, मोरवणे, पाष्टी,मांदाटणे या गाव , वाडी , वस्ती यांचा महत्वाचा सहभाग असतो. या कार्यक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद कृषी व संवर्धन सभापती बबन मनवे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समिर घारे म्हसळा तालुक्याचे तहसीलदार आणि ईतर मान्यवर उपस्थित होते. नुकतेच रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सुशांत पवार यांचा सन्मान ग्रामपंचायत वतीने करण्यात आले.
विविध शासकीय योजना गावामध्ये राबविल्या पाहिजेत. प्रत्येक घरामध्ये स्वतःचा शौचालय आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्या गावाबद्दल जागरूकता असली पाहिजे. श्रमदानातून ग्रामस्वच्छता कार्यक्रम राबविले असावेत. कोणतेही काम आपलं घरचं काम आहे, यांची जाणीव प्रत्येक व्यक्तीला व्हावी. या आपुलकीची भावना ठेवून ग्रामपंचायत कार्य करत आहे. यावेळी, वंचितांना साहित्य वाटप, महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, आरोग्य व स्वच्छता या विषयावर महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन करण्यात आले., जनजागृतीचा कार्यक्रम म्हणून
चमत्कार सत्यशोधन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वरील सर्व विविध उपक्रम महिला दिनानिमित्त यशस्वी पार पडले.
या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी गायकवाड साहेब होते. रायगड भूषण सुशांत भि. पवार यांचा सर्व ग्रामस्थ व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिमाखात अभिनंदन सोहळा पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनयकुमार सोनावणे सर यांनी केले. व आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल पाटील सरांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. भोसले सर, प्रा. सुमित चव्हाण, प्रा. खुताडे मॅडम, म.अ. नवाज नजीरे, मी. टाईम्सचे पोटले साहेब, वनविभागाचे शिंदे साहेब, अंनिसचे चमत्कार प्रशिक्षण घेण्यासाठी रुपेश गमरे, पशू संवर्धन डॉ. राठोड, पो.पा. स्नेहा पवार, तंटामुक्त अध्यक्ष अनंत पवार, उपसरपंच शंकर गोरिवले शांताराम खंटे, भिकु डोंगरे, निता पवार, धनश्री मुंडे, शेफाली लाड, मिनाक्षी मनवे, प्रज्ञा दिवेकर, शुभांगी शिगवण, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत मांदाटणे यांच्यामार्फत पंचक्रोशीमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. सरपंच हे शैक्षणिक उपक्रम असो किंवा सामाजिक उपक्रम असो ते नेहमीच पुढाकार घेऊन लोकसहभागातून कार्य करत असतात. हि ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी सरपंच व सर्व सदस्यांची नेहमीच धडपड चालू असते. भविष्यात ही मांदाटणे ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुढे वाटचाल करत आहे. नक्कीच एक तालुक्यातून जिल्हा स्तरावर नाविन्यता मिळवण्याचे काम गृप ग्राम पंचायत मांदाटणे करत आहे.
Post a Comment