म्हसळयात पोलीस नाही गस्तीवर : अवैध धंदे- चोरटे वस्तीवर


संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा शहरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी मूळ धरत चालली असून त्याचा प्रत्यय म्हणून शहरांत व तालुक्यांत बेकायदेशीर अवैध धंदे, जुगार,मटका,गुटखा या बरोबरीनेच घरफोडया,दानपेट्यावर डल्लाअसेही गुन्हे घडत आहेत, छोट्या मोठया अपघातांचे प्रमाणही वाढत आहेत.या बाबत नागरिकांच्यात चर्चा असताना रायगड जिल्ह्याचे गुन्हा अन्वेषण विभाग आलिबागने म्हसळा शहरांत व तालुक्यांत काही दिवसाचे अंतराने एकदा मटका व  एकदा हातभट्टीच्या व्यवसायावर धाड टाकल्याचे समजते. तालुक्यातील रेवली गावात गुन्हा अन्वेषण विभाग आलिबागच्या पोलीस हवलदार संजिवनी अनंत म्हात्रे यानी दिलेल्या फिर्यादीमुळे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा रजी क्र.१४ /२०२२ नेदाखल करण्यात आलाआहे.यामध्ये बाळाराम धोंडू पाटील (वय65रा. रेवली)  यांचे जवळ१८ तीटर गावठी दारू(किंमत रु2180) सापडली.गुन्हा अन्वेषण विभाग आलिबागचे पोलीस निरिक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली A.S.I कोरम,पो.हे.कॉ.परेश म्हात्रे, खैरनार, जाधव यांचा सहभाग होता.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा