श्री.आदित्य ठाकरे यांचा रायगड जिल्हा दौरा | aditya thackeray


पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांचा रायगड जिल्हा दौरा


टीम म्हसळा लाईव्ह
राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री श्री.आदित्य ठाकरे हे बुधवार, दि.30 मार्च 2022 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:-

दुपारी 12.30 वाजता दापोली येथून मोटारीने महाड जि.रायगड कडे प्रयाण. दुपारी 02.00 वाजता महाड येथे आगमन व राखीव. दुपारी 02.40 वाजता मोटारीने लोणेरे ता.माणगाव कडे प्रयाण. दुपारी 03.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरात इक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमिपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि.रायगड.) सायंकाळी 04.15 वाजता मेळाव्यास उपस्थिती (स्थळ: टिकमभाई मेहता कॉमर्स कॉलेज, बामनोळी रोड, माणगाव.) सायंकाळी 05.30 वाजता मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा