फोटो :कार्यालयांत एकही कर्मचारी नसून निवासी नायब तहसीलदार के.टी.भिंगारे महत्वाचे कामकाज करीत असताना.
नागरिकाना क्षमस्व! आमचा नाईलाज आहे!!
रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज लाक्षणिक बंद. :म्हसळा महसूल मधील काम ठप्प.
संजय खांबेटे : म्हसळा
तहसील कार्यालय म्हसळा येथे महसूल कर्मचारी संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प ठेऊन लाक्षणिक बंद करण्यात आले. शासनाने प्रलंबीत मागण्यावर निर्णय न धेतल्यास सोम.दि.४ एप्रिल पासून कामकाज बेमूदत बंद रहाणार आसल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन धोंडगे यानी वार्तालाप करताना सांगितले. शासन स्तरावर मागील दोन वर्षे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने महसूल संघटनेला बेमुदत संपावर जाण्याचा मार्ग पत्करावा लागेल आसेही धोंडगे यानी सांगितले. आजच्या संपात गट क मधील १४ कर्मचारी आणि गट ड मधील ७ कर्मचाऱ्यांरी असे २१ कर्मचारी सहभागी आसल्याचे निवासी नायब तहसीलदार के.टी.भिंगारे यानी सांगितले.आजच्या लाक्षणिक संपात उपाध्यक्ष गणेश महाडीक,श्रीमती तृप्ती साखरे, संध्या अंबुर्ले,सरिता लिमकर, ऐनकर,विशाल भालेकर,महेश रणदिवे,विश्वास पाडावे,प्रकाश भोईर,राजेश मोरे, दिपक चव्हाण, केशव कांबळे या कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.राज्यातील महसूल विभागात महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून महसूल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. शासन निर्णय महसूल व वनविभाग दि. १० मे २०२१ अन्वये नायब तहसिलदार संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांची सेवा जेष्ठता याद्या राज्य स्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे. परंतु अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद्द करावे तसेच इतर मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत आहेत यासाठी आंदोलन सुरु आसल्याचे सांगण्यात आले.
"आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करताना नागरिकाना क्षमस्व म्हणतो आमचा नाईलाज आहे.असे सांगत असून शासनच संघटनेच्या मागण्यांकडे हेतुपुरस्कर दुलक्ष करीत आहे"सचिन धोंडगे,अध्यक्ष,महसूल कर्मचारी संघटना म्हसळा.
Post a Comment