- म्हसळा तालुक्यातील शासकिय समित्यांचे गठण.
- राष्ट्रवादी काँग्रेस विरुध्द शिवसेना जुंपणार.
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुका समन्वय समिती आणि संजय गांधी निराधार योजना समिती या दोन समीत्यांचे गठण नुकतेच पालकमंत्री यानी केले.राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकार मधील मुख्यमंत्री आमचे आहेत त्याप्रमाणे तालुका शिवसेनेला योग्य प्रतिनिधीत्व पालकमंत्री आदीती तटकरे यानी न देता आमचे तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आसल्याचा आरोप म्हसळा तालुका शिवसेनेचे माजी ता. प्रमुख नंदू शिर्के यानी केला आहे.
समन्वय समिती आणि संजय गांधी निराधार समिती या दोनही समीत्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, समन्वय समितीत महाविकास आघाडी तील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला दोन सदस्य तर कॉंग्रेसला एक सदस्य असे वाटप केले आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना प्रत्येकी 33 टक्के वाटा मंडळे, महामंडळे आणि तालुका समित्यांवर मिळणार असल्याचा दावा नंदू शिर्के यांचा आहे. जिल्हा व तालुका स्तरावर प्रत्येक शासकीय विभागात समित्या आहेत. या शासकीय समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीचा अधिकार बहुतांश समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री आदीती तटकरे याना असतो.
तालुका समन्वय समितीवर शिवसेनेचे संतोष दाजी जाधव (सुरई), श्रीमती संपदा गौरव पोतदार (म्हसळा), काँग्रेसचे फजल हळदे (म्हसळा), संजय गांधी निराधार समितीत शिवसेनेचे श्रीमती निशा नारायण पाटील (रेवली), रमेश मिश्रीमल जैन (म्हसळा), काँग्रेसचे महादेव भिकू पाटील (निगडी) यांची निवड झाली आहे. आवश्यकता वाटल्यास शिवसेनेचे सदस्य राजीनामा देतील असेही नंदू शिर्के यानी रांगितले.
"म्हसळा तालुका काँग्रेसला तालुका स्तरावर प्रत्येक शासकी य समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून झालेल्या नेमणूकीत आम्ही समाधानी आहोत."-महादेव भिकू पाटील, माजी तालुका अध्यक्ष .कॉंग्रेस (आय)
Post a Comment